Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांसाठी आज सोन्यासारखा दिवस

Anjali Potdar

मेष

अक्षय तृतीयाचा दिवस तुमच्यासाठी सोन्याच्या संधी घेऊन आला आहे. सोने खरेदी फायदेशीर ठरेल. कुटुंबीयांसोबत दिवस मजेत घालवाल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

अक्षय तृतीयाचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. काही गोष्टी मिळण्यासाठी विशेष आराधना करा. मनासारख्या गोष्टी घडतील.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

आज तुमचा खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. उगाचच मनस्ताप करून घेऊ नका.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

आज उगाच आटापिटा करू नका. कामाच्या रगड्यात स्वतःला गुंतवून घेऊ नका. आनंद सगळ्यांना वाटा दिवस मस्त होईल.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

नव्या जोमाने काम कराल, तर पैसाही खणखणीत येईल. काही गोष्टींचे मनात इमले बांधाल. इतरांचे मनावर घेऊ नका.

Sinh Rashi bhavishya | Saam TV

कन्या

कर्म करा आणि सुखी राहा. मनाचे मनोरे उंच भराऱ्या घेतील. सर्वांचीच साथ मिळेल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

तुमच्यासाठी आजचा दिवस सोन्यासारखा आहे. काही गोष्टी पाचवीला पुजल्यात त्या काही तुम्हाला टाळता येणार नाहीत. त्रागा करून घेऊ नका.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

जोडीदाराविषयीचे प्रेम वाढेल. तुटलेली नाती आज नव्याने बांधण्याचा प्रयत्न करा. दिवस आनंदात जाईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. पितरांसाठी विशेष दान करा. केलेले पुण्य पतरात पडेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी सौख्य घेऊन आलेला दिवस. सर्व काही अलबेल असेल. मनासारख्या घटना घडतील.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आज नवीन वस्तू खरेदीचे योग आहेत. दूध दुभते जनावरांची आज विशेष सेवा करा. पुढील भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

ठरवलेली सर्व कामे मार्गी लागतील. फक्त मनाची इच्छाशक्ती ठेवा. इतरांसाठी भक्कमपणे उभे राहाल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: रिंकूच्या सौंदर्याची हवा; गुलाबी साडीत खुललं सौंदर्य

Rinku Rajguru Gudi padwa Saree Look: | Saamtv