Gangappa Pujari
पवित्र केदारनाथ यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे.
आज पहाटे ६.२० वाजता भाविकांसाठी केदारनाथचे कवाडं उघडण्यात आले.
भारतात १२ ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे.
फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून या साठी २० क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे.
केदारघाटी हर-हर महादेव आणि जय भोलेनाथच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
सहा महिन्यांनंतर उघडणार असल्याने भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
मंदिराचे मुख्य द्वार उघडून केदारनाथचे रावल भीमाशंकर लिंग आणि मुख्य पुजारी यांनी शिवलिंग मंदिरात प्रवेश केला.
या कार्यक्रमावेळी उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील उपस्थित होते.