
Parenting Tips : आई ही प्रत्येक कुटुंबाच्या घराचा भक्कम पाया असते. त्याच बरोबर ती आपल्या घराचा एक आरसा देखील असते ज्यामुळे एक चांगले कुटुंब व समाज तयार होतो. तिने एका उत्तम पत्नीबरोबरच चांगली आई देखील बनन गरजेचं असतं.
आचार्य चाणक्यांनी मैत्री (Friends), पती-पत्नी व इतर सगळ्या गोष्टींबाबत विविध गोष्टी सांगितल्या आहेत. पण एक उत्तम स्त्री चांगल्या कुटुंबासोबत (Family) मुलाला चांगले संस्कार देऊ शकते. यामध्ये त्यांनी उदाहरण दिलंय ते जिजाऊच. चाणक्य म्हणतात की, जिजाऊनी घेतलेल्या कष्टामुळे शिवाजी महाराज घडले. त्याची शिकवण्याची पद्धत,योग्य संस्कार यामुळे शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्य घडवल त्यांसाठी जाणून घेऊया सुपर मॉम होण्यासाठी कोणते गुण असायला हवे.
1. शांत स्वभाव
शांत स्वभाव असलेली स्त्री लक्ष्मी स्वरूप आहे. अशा स्त्रियांमध्ये घराची शोभा वाढवण्याची क्षमता असते. अशा स्त्रीच्या (Women) घरात राहिल्याने घरात सुख-शांती कायम राहते. कुटुंबाची खूप प्रगती होते. अशी स्त्री पुरुषाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते शांत पत्नी शांत आई बनते आणि तेच गुण आपल्या मुलांमध्ये बिंबवते. शांत वातावरणात मुलांचा मानसिक विकास झपाट्याने होतो. अशी मुले अधिक लक्ष केंद्रित करतात आणि अभ्यासात उत्कृष्ट असतात.
2. सुशिक्षित आणि सुसंस्कृत
एक शिक्षित, सुसंस्कृत आणि सद्गुणी स्त्री आपल्या पतीसाठी वरदानापेक्षा कमी नाही, तसेच अशी आई आपल्या मुलांना चांगले वागणूक देते, ज्याचा समाजाला फायदा होतो. अशी स्त्री आत्मविश्वासाने भरलेली असते. सत्य सांगण्यापासून ती कधीच मागे हटत नाही. अशा आई आणि पत्नी कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी जो काही निर्णय घेतात तो पूर्णपणे योग्य असतो.
3. मुधर वाणी
मृदुभाषी स्त्री केवळ आपल्या पतीचे जीवनच स्वर्ग बनवत नाही, अशी स्त्री जेव्हा आई बनते तेव्हा तिच्या मुलांमध्येही हा गुण स्वाभाविकपणे येतो. अशी मुले उत्तम वक्ते बनतात आणि आपल्या भाषणाने प्रत्येक क्षेत्रात नाव कमावतात. प्रत्येकाला हे लोक आवडतात. मृदू बोलणारी स्त्री आणि आई तिच्या बोलण्यातून दु:खातही गोडवा विरघळवण्याची क्षमता असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.