Chanakya Niti On Human Nature : या स्वभावाची लोक असतात स्वार्थी व लोभी, चार हात लांबच राहा !

Chanakya Niti On Lifestyle : इतरांचे दु:ख समजून घेणे आणि त्यांना थोडीफार मदत करणे किंवा सांत्वन करणे अशा प्रकारची असतात.
Chanakya Niti On Human Nature
Chanakya Niti On Human NatureSaam Tv

Types Of Human Nature : आपल्या आयुष्यात अशी अनेक लोक असतात जी फक्त कामापुरता असतात. त्यांना फक्त गरजेपूर्ता ओळख ठेवायची असते. यातील बरेच माणसे अशी असतात की ते इतरांचे दु:ख समजून घेणे आणि त्यांना थोडीफार मदत करणे किंवा सांत्वन करणे अशा प्रकारची असतात.

त्यात काही अशी माणसं (Human) असतात जी दुसऱ्याचं दु:ख कधीच समजू शकत नाही. असे लोक नेहमी स्वत: च्या हिताचा विचार करतात. असे लोक स्वार्थी स्वभावाचे असतात. आचार्य चाणक्य (Chanakya) यांच्या म्हणण्यानुसार समाजात असे अनेक लोक आहेत जे इतरांचे दु:ख समजत नाहीत किंवा कोणतीही सहानुभूती व्यक्त करत नाहीत. चाणक्याच्या मते हे लोक कोण आहेत माहित आहे का?

Chanakya Niti On Human Nature
Chanakya Niti On Success : चाणक्यांनी सांगितला, अपयशाकडून यशाकडे जाण्याचा मार्ग...

1. अंमली पदार्थांचे व्यसन

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक अंमली पदार्थांचे व्यसन करतात त्यांना कोणाचीही पर्वा नसते, त्यांना इतरांच्या सुख-दु:खाची पर्वा नसते. आचार्य म्हणतात की, सतत नशेत राहिल्याने जगाशी संपर्क तुटतो. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमुळे त्यांच्यातील संवेदनाही संपुष्टात आल्याने ते इतरांचे दु:ख समजू शकत नाहीत.

2. स्वार्थी लोक

आचार्य चाणक्य यांच्या मते काही लोक नेहमी फक्त स्वतःबद्दलच विचार करतात. अशी लोक स्वार्थी (Selfish) असतात. असे लोक फक्त स्वत:चा विचार करतात. हे लोक आपल्या स्वार्थापुढे इतरांच्या दुःखाची पर्वा करत नाहीत. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे आणि त्यांच्या जवळ येऊ देऊ नये. ते स्वतःच्या स्वार्थाशिवाय इतर कोणाचाही विचार करत नाहीत.

Chanakya Niti On Human Nature
Chanakya Niti On Friendship : या 3 व्यक्तींसोबत मैत्री कधीच करु नका, अन्यथा प्रगतीत येतील अनेक अडचणी

3. चोर

चाणक्य म्हणतात की, चोर आणि दरोडेखोर दुसऱ्यांच्या दुःखाची पर्वा करत नाहीत. आचार्य म्हणाले की चोरीमुळे इतरांना फारसा त्रास होईल असे वाटत नव्हते. त्याचबरोबर ते कोणत्याही व्यक्तीच्या घरातही तो चोरी करायला चुकत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com