Chanakya Niti On Friendship : या 3 व्यक्तींसोबत मैत्री कधीच करु नका, अन्यथा प्रगतीत येतील अनेक अडचणी

Friendship Tips : मैत्री हे नातं असं आहे की, ते नातं आपल्या हक्काचं असतं. आपल्या चांगल्या व वाईट काळात ती सतत सोबत असते.
Chanakya Niti On Friendship
Chanakya Niti On FriendshipSaam Tv
Published On

Success Tips : आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसं असतात त्यांच्याशी आपण मैत्री करतो. मैत्री हे नातं असं आहे की, ते नातं आपल्या हक्काचं असतं. आपल्या चांगल्या व वाईट काळात ती सतत सोबत असते.

परंतु, कधी कधी मैत्रीत (Friends) असे देखील चेहरे असतात जे खोटा मुखवटा घालून फिरतात. मग ते तुमच्या वाईट काळात त्यांचे खरे रंग दाखवतात. असे म्हणतात की त्यांचे पालन करणारा कधीही पराभूत होत नाही, त्याला चांगले आणि वाईट लोक ओळखण्यात कोणतीही अडचण येत नाही. आचार्य चाणक्य (Chanakya) सांगतात की जर एखाद्या व्यक्तीने या 3 लोकांपासून अंतर ठेवले तर त्याला आनंदासोबत यशही (Success) मिळते. या 3 लोकांचा सहवास एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा बनतो, म्हणून त्यांना त्वरित सोडणे आवश्यक आहे.

Chanakya Niti On Friendship
Chanakya Niti On Personality Development : चाणक्य सांगतात, पर्सनालिटी डेवलपमेंट करताना या 5 चुका करु नका

1. मुर्खांची संगत -

आचार्य चाणक्य असे मानतात की मूर्ख व्यक्तीला कधीही उपदेश करू नका. याचा कधीही फायदा होत नाही. कारण ही मूर्ख व्यक्ती स्वत:ला श्रेष्ठ समजतो. अशी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीचे ऐकत देखील नाही. अशा लोकांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान देणे म्हणजे तुमचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे. अशा लोकांपासून अंतर राखणे चांगले आहे कारण ते फक्त वेळ वाया घालवत नाहीत तर तुमच्या यशात अडथळे देखील बनतात.

2. प्रत्येक क्षणाला त्रास देणाऱ्या स्त्रिया

आचार्य चाणक्यांनी अशा महिलांनाही चुकीचे मानले आहे ज्या केवळ स्वतःचे म्हणणे खरे करतात. कोणत्याही व्यक्तीचे ते ऐकत नाही. चाणक्य म्हणतात की, दुष्ट स्वभावाच्या पत्नीसोबत राहणे, जिच्या शब्दात कटुता, खोटे बोलणे आणि फसवणूक करणे हे नरकात राहण्यासारखे आहे. अशा महिला घरात राहिल्याने भावी पिढीवर वाईट परिणाम होतो. अशा स्त्रिया स्वतःचे तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्यांचेही नुकसान करतात.

Chanakya Niti On Friendship
Chanakya Niti On Success : चाणक्यांनी सांगितले मनुष्याच्या जीवनातील कडू सत्य, या गोष्टींची काळजी घेतल्यास आयुष्यात मिळते यश

3. सतत रडरड करणारी व्यक्ती

चाणक्य म्हणतात की दुःखात एखाद्याला त्रास देणे चांगली गोष्ट आहे परंतु, अशा लोकांना समजावून काही फायदा नाही. अशी माणस दु:खातून कधीच बाहेर येत नाही. कारण जोपर्यंत ते स्वतःहून बाहेर पडू इच्छित नाहीत. अशा लोकांच्या मागे तुमचे कष्ट तुमची मेहनत वाया जाऊ शकते. तसेच अशा लोकांसोबत राहिल्याने व्यक्ती स्वतः नकारात्मक विचार करू लागते आणि वाईट गोष्टी त्याच्या मनावर वर्चस्व गाजवू लागतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com