Chanakya Niti On Human Nature: या स्वभावाची माणसे अधिक घातक ! सल्ला देण्यापूर्वी विचार करा

Chanakya Niti On Lifestyle : काही माणासांची वृत्ती ही अधिक चांगली असते तर काही हे अती स्वार्थी असतात.
Chanakya Niti On Human Nature
Chanakya Niti On Human NatureSaam Tv
Published On

Types Of Human Nature : आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसे असतात ज्यांच्या आपल्याशी मैत्री, ऑफिस कलीग किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे आपला त्यांच्याशी संबंध येतो. यामध्ये जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत.

काही माणसांची वृत्ती ही अधिक चांगली असते तर काही हे अती स्वार्थी असतात. अशावेळी चाणक्य (Chanakya) म्हणतात की, माणूस सर्व समस्यांपासून दूर राहू शकतो. तसेच समाधानी आणि यशस्वी (Success) जीवन जगू शकतो.

Chanakya Niti On Human Nature
Chanakya Niti On Success : जीवनात यशस्वी व्हायचे आहे ? ही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, चाणक्यांनी दिला सल्ला

चाणक्य म्हणतात की, माणूस आपल्या कितीही जवळचा असला तरी त्याला कोणत्याही गोष्टींचा सल्ला देऊ नये. याचा ते लोक चुकीचा अर्थ काढतात. अशी माणसे आपल्या आयुष्यात निरर्थक असतात. त्यामुळे कोणत्या लोकांना सल्ला देणे टाळावे हे जाणून घेऊया

1. लोभी

लोक पैशाच्या (Money) लालसेने सर्व काही करतात. लोभ आणि लालसेच्या भरात हे लोक चुकीच्या मार्गावर चालणे टाळत नाहीत. अशा माणसांना सल्ला देणे म्हणजे शत्रूत्व अंगावर ओढून घेण्यासारखे आहे.

Chanakya Niti On Human Nature
Chanakya Niti On Success : चाणक्यांनी सांगितला, अपयशाकडून यशाकडे जाण्याचा मार्ग...

2. संशयी

कोणत्याही नात्यात संशय आला तर वेळीच तो दूर करा किंवा अशा व्यक्तींपासून लांब राहा. अशा माणसांना वाटते आपण त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ते आपल्याशी शत्रूत्व करतात.

3. मूर्ख

चाणक्य म्हणतात की, अति शाहणपणा असणाऱ्या माणसांना कधीही सल्ला देऊ नका. जो पूर्णपणे व्यर्थ ठरतो. ज्या व्यक्तीला आपल्याला बोलण्यामागचे कारण कळेल अशा माणसांना सांगा

Chanakya Niti On Human Nature
Place To Visit in Rainy Seasons : पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत बेस्ट !

4. चुकीची व्यक्ती

चाणक्य म्हणतात की, जी माणसं स्वभावाने चुकीचे असतात ते लोक नेहमीच चांगल्या व्यक्तीला आपला शत्रू मानतात. असे लोक नेहमी आपली फसवणूक करण्याता प्रयत्न करतात. जर तुम्ही त्यांना काही चांगले सांगितले तर ते तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतात. त्यासाठी अशा माणसांपासून दूर राहाणे चांगले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com