Office Work Tips : ऑफिस म्हणजे दुसरं घरचं... प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात, त्यामुळे समाजात तो आपली चांगली छाप सोडतो. चाणक्याच्या मते या स्पर्धेच्या या युगात कष्ट केल्याशिवाय माणासाला यश प्राप्त होत नाही. त्यासाठी स्पर्धा करणे व यश मिळवणे हाच एकमेव मार्ग असतो.
जे लोक कठीण परिश्रम करुन पुढे जातात आणि कामाच्या ठिकाणी काही गोष्टींची विशेष काळजी घेतात. त्यांचे यश (Success) कोणीच थांबवू शकत नाही. आपल्या जवळपास अशी माणसं खूप कमी असतात ज्यांची सर्वत्र प्रशंसा होत असते. जी सगळ्यांना ऑफिसमध्ये (Office) प्रिय असते. जर तुम्हालाही ऑफिसमध्ये सगळ्याचे प्रिय व्हायचे असेल तर चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा.
आचार्य चाणक्य (Chanakya) यांच्या मते, ज्या लोकांमध्ये कामाच्या ठिकाणी सर्वांना सोबत घेण्याची भावना असते त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. सर्वांसोबत एकत्र काम केल्याने काम जलद होतेच, परंतु प्रत्येक सदस्याला आव्हानांवर मात करण्याची कला शिकण्यास देखील मदत होते. सगळ्यांना मदत करणारी माणसं ऑफिसमध्ये सगळ्यांनाच आवडतात, कारण या लोकांमध्ये न्यूनगंड नसतो. त्यांच्या कामात अडचणी आल्यावर ते घाबरत नाही. त्यामुळे त्यांना सहज सगळ्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळतो.
कामाच्या ठिकाणी अशक्य मानले जाणारे टार्गेट एकट्या व्यक्तीकडून पूर्ण होऊ शकत नाही. मित्रपक्षांशिवाय मोठे ध्येय गाठणे फार कठीण असते. चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या टीममध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही आदर करायला हवा. ज्यामुळे तुम्हाला तुमचे काम देखील व्यवस्थितपणे पूर्ण करता येईल व तुमच्या प्रगतीचा वेग कुणीच थांबवू शकणार नाही.
चाणक्यच्या मते, जेव्हा उच्च पदावर असलेल्या व्यक्तीमध्ये नेहमी कामाच्या ठिकाणी प्रतिभावान व्यक्तीला प्रोत्साहन देण्याची भावना असते. तेव्हा तो सर्वत्र आदरास पात्र बनतो. कामाच्या जबाबदारीचे प्रतिभेनुसार वाटप केल्याने काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने पूर्ण होते. पण दुसरीकडे कटकारस्थान करणारी व्यक्ती नेहमी स्वत:चे भविष्य खराब करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.