Chankya Niti: आयुष्यात हे लोक कधीच सुखी राहू शकत नाही; जाणून घ्या कारण

Chankya Niti : आयुष्यात नेहमी चांगल्या मार्गावर चालायला हवे.
Chankya Niti
Chankya NitiSaam Tv
Published On

Chankya Niti On People:

आयुष्यात नेहमी चांगल्या मार्गावर चालायला हवे. त्यासाठी चाणक्य नेहमीच सल्ले देत असतात. चाणक्य यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागल्यास आयुष्यात अडचणी येत नाही. ते लोक कधीच सुखी राहतात. त्यासाठी चाणक्य यांनी काही सल्ले दिले आहेत.

जीवनात चढ-उतार, सुख- दुःख येत असतात. परंतु काही लोकांना क्वचितच दुःखाचा सामना करावा लागतो. हे लोक नशीबवान असतात. त्यासाठीच चाणक्य यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

हे लोक नेहमी दुःखी असतात.

चाणक्य नीतीनुसार जगात तीन प्रकारचे लोक दुःखी असतात. खूप पैसा असूनही लोक दुःखात असतात. त्यामागे त्यांची काही वैयक्तिक कारणे असतात.

ज्यांच्यावर कर्ज असते.

ज्या व्यक्तीवर कर्ज असते ती व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही. त्याने कितीही सुखी राहण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना सारखे आपल्यावर कर्ज आहे हे आठवत असते. त्यामुळे ते लोक नेहमी दुःखात असतात. ते हे कर्ज आयुष्यभर फेडत असतात. त्यामुळे त्यांना जीवनाचा आनंद घेता येत नाही.

Chankya Niti
Flipkart Tv Offers: 22000 मिळत आहे 1 लाख रुपये किमतीचा 55 इंच टीव्ही, या 6 मॉडेल्सवरही मोठी सूट

ज्यांची मुले बेजबाबदार असतात

ज्या व्यक्तीचा मुलगा हा बेजबाबदार असतो. ते कुटुंब किंवा ते पालक कधीच सुखी राहू शकत नाही. त्यांचे आयुष्य संपूर्णपणे मुलाच्या काळजीत जाते. मुलाला शिकवण्यात जाते. मुलाला चांगले धडे देण्यासाठी ते लोक खूप मेहनत करतात.

ज्यांच्या घरात भांडणे होतात

ज्यांच्या घरात नेहमी भांडणे असतात. ते लोक कधीच खूश राहू शकत नाही. कोणाच्या घरात मुलगा-वडीलांमध्ये भांडण असतात. तर कोणत्याच्या घरात सासू सुनेमध्ये भांडणे असतात. त्यामुळे हे कुटुंब नेहमी दुःखी असते.

Chankya Niti
Upcoming Superbikes : जबरदस्त लूक, 500cc चे दमदार इंजिन; येतेय नवीन Benelli Tornado सुपरबाईक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com