Chanakya Niti On Parenting : तुमच्या मुलांचे असे संगोपन करा, प्रत्येक गोष्टींमध्ये राहील पुढे

Parenting Tips : महान चाणक्यांची धोरणे आपले जीवन सुकर करण्यासाठी किती प्रभावी आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. तुम्ही तुमच्या मुलांच्या संगोपनासाठी चाणक्य धोरणे देखील अवलंबू शकता.
Chanakya Niti On Parenting
Chanakya Niti On ParentingSaam Tv
Published On

Chanakya Niti :

महान चाणक्यांची धोरणे आपले जीवन सुकर करण्यासाठी किती प्रभावी आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. तुम्ही तुमच्या मुलांच्या संगोपनासाठी चाणक्य धोरणे देखील अवलंबू शकता. चाणक्यांनी मुलांच्या संगोपनासाठी अशी काही धोरणे दिली आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांना आनंदी जीवन (Life) देऊ शकता आणि त्याला यशस्वी होण्यास मदत करू शकता.

मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांना खूप त्याग करावा लागतो. त्यांना त्यांच्या स्वतःचा आनंद आणि गरजां पूर्ण करण्यापूर्वी त्यांच्या मुलांचा विचार करावा लागतो. चाणक्यांच्या या धोरणांवरून तुम्हाला कळू शकते की तुम्ही तुमच्या मुलाचे संगोपन कसे करावे.

चाणक्य म्हणतात की, शेतकऱ्यासाठी त्यांची पिके असतात तशीच आई-वडिलांसाठी त्यांची मुलं असतात. पालकांनी आपल्या मुलांचे संगोपन त्याच मेहनतीने आणि समर्पणाने केले पाहिजे जशी शेतकरी आपल्या पिकांची करतो. यामुळे मुलांना त्यांचे पालक आपल्यावर किती प्रेम (Love) करतात याची जाणीव होते आणि अशा वातावरणात मुले सुरक्षित वाटू शकतात.

Chanakya Niti On Parenting
Chanakya Niti: श्रीमंत कसं व्हायचं? चाणक्यांचा नवा मार्ग वाचा

सर्वांचा आदर करा

चाणक्य नीतीनुसार, तुम्ही तुमच्या मुलांना सर्वांचा आदर करायला शिकवले पाहिजे. चाणक्य म्हणतात की, जो व्यक्ती आपल्या वडीलधाऱ्यांचा, आपल्या शिक्षकांचा आणि पालकांचा आदर करतो त्याला समाजात सर्वोच्च स्थान मिळते. एक पालक म्हणून, आपल्या मुलांना मोठ्यांचा आदर करण्यास आणि लहानांवर प्रेम करण्यास शिकवणे आपले कर्तव्य आहे.

योग्य आणि अयोग्य यातील फरक

चाणक्यानी पालकांसाठी एक सूचना देखील दिली आहे की, त्यांनी आपल्या मुलांना योग्य आणि अयोग्य तसेच धर्म आणि अनीतिमध्ये फरक करण्यास शिकवले पाहिजे. चाणक्य म्हणतात, अशी मुले त्यांच्या कुटुंबाला वैभव मिळवून देतात.

Chanakya Niti On Parenting
Chanakya Niti On Women : पुरुषांनो, या स्त्रियांनाच ठेवा तुमच्या आयुष्यात, राहाल जन्मभर सुखी

आज्ञाधारक बनवा

चाणक्य म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच योग्य मार्गाचे अनुसरण करण्यास शिकवले तर तो कधीही तुमच्या आदेशांचे उल्लंघन करणार नाही. त्यांच्या मते, आपल्या मुलांना चांगुलपणा आणि योग्य मार्ग दाखविणे हे पालकांचे कर्तव्य आहे आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हे करण्यात मागे हटले नाही पाहिजे. ज्या पालकांची मुले आज्ञाधारक असतात ते खूप भाग्यवान मानले जातात.

शिकण्याची उत्सुकता

पालकांनी लहानपणापासूनच मुलांमध्ये शिकण्याची इच्छा निर्माण केली पाहिजे. चाणक्य सांगतात की, जो माणूस ज्ञान मिळवण्यासाठी आणि शिकण्यासाठी उत्सुक असतो, त्याला माता लक्ष्मी आणि देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो. तुम्ही तुमच्या मुलांना नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com