हिंदू धर्मात विवाह विशेष महत्त्व असून १६ संस्कारातील हे एक संस्कार आहे. लग्न ही दोन व्यक्तींच्या आयुष्याची नवी सुरुवात असते. नवदाम्पत्याला अपेक्षा असते की, त्यांचं वैवाहिक जीवन आनंदी राहिलं पाहिजे. लग्नादरम्यान अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते जेणेकरुन किरकोळ चुकीचाही परिणाम लोकांच्या भविष्यावर होऊ नये.(Latest News)
लग्न (Marriage) वगैरे बाबींमध्ये कपड्यांपासून जेवणापर्यंत आणि लग्नपत्रिकेपासून (Wedding Card) ते वधू मुलींची सासरी रवानगी होईपर्यंत सर्वच गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. जेणेकरून नवदाम्पत्याला आनंदी जीवन लाभावं. परंतु तुम्हाला माहिती आंनदी वैवाहिक जीवनासाठी लग्नपत्रिका महत्त्वाची असते असं. अनेकवेळा लोक त्यांच्या आवडत्या लग्नपत्रिकेमुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) लग्नपत्रिकेबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. लग्नपत्रिकेशी संबंधित नियम पाळले तर वैवाहिक जीवन आनंदी राहते आणि वैवाहिक जीवनात (married life) फारशा अडचणी येत नाहीत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लग्नपत्रिका बनवतांना या गोष्टी लक्षात ठेवा
वास्तुशास्त्रानुसार लग्नपत्रिका छापतांना काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. जसं की, कमळ हे खूप शुभ मानले जाते. अशा काही शुभ गोष्टी केल्यास वैवाहिक जीवन सुखी राहते. वास्तुशास्त्रानुसार लग्नपत्रिका बनवताना त्याच्या आकाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. मोठे किंवा त्रिकोणी आकाराचे लग्नपत्रिका कधीही बनवू नये. साधी आणि चार कोपरे असलेली लग्नपत्रिका शुभ मानली जाते. चार कोपऱ्यातील लग्नपत्रिका ही सुख, समृद्धी, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं.
यासह लग्नपत्रिकेचा रंग देखील महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. लग्नपत्रिका साधारण गडद रंगाची असली पाहिजे हा हट्ट सोडला पाहिजे. लग्नपत्रिका कधीही गडद रंगाची नसावी. म्हणजेच काळ्या किंवा तपकिरीसारख्या गडद रंगाची लग्नपत्रिका चुकूनही बनवू नका.
लग्नपत्रिकेवर वधू-वर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची नावे कोणत्याही गडद रंगात लिहू नयेत. वास्तूनुसार लग्नपत्रिका बनवण्यासाठी सर्वात शुभ रंग पिवळा आहे. तुम्ही लाल रंगात किंवा हलक्या रंगात लग्नपत्रिका बनवू शकता. लग्नपत्रिकेत वापरण्यात येणारा कागद सुगंधित असावा, हे लक्षात ठेवा, यामुळे प्रत्येक काम शुभ होते.
(टीप : येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. साम न्यूज टीव्ही याची पुष्टी करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.