Chanakya Niti On Work : नवीन जॉब शोधण्यापूर्वी नियोजन हवेच! चाणक्यांनी दिला यशस्वी होण्यासाठी सल्ला

How to Make a Work Plan : यशस्वी बनण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण अधिक मेहनत घेतात खरे पण वाट्याला येते ते सतत अपयश
Chanakya Niti On Work
Chanakya Niti On WorkSaam tv

Planning Tips : यशस्वी बनण्यासाठी तुम्ही काय करता? कोणत्या क्षेत्रात यश हवे आहे? यश कसे मिळेल? सतत अपयश हाती येत का? यशस्वी बनण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण अधिक मेहनत घेतात खरे पण वाट्याला येते ते सतत अपयश

आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही कामात यश हवे असेल तर आपल्याला त्याचे योग्यरित्या नियोजन करणे अधिक गरजेचे आहे. जर तुम्ही कोणतेही नवीन काम हाती घेतले असेल तर त्याविषयी आपल्याला योग्य ती माहीती असणे गरजेचे आहे. कामात यश हवे असेल तर नियोजन कसे कराल हे जाणून घेऊया.

Chanakya Niti On Work
Thane Picnic Spots: पिकनिक स्पॉट शोधताय? ते ही ठाण्यात; ही १० पर्यटनस्थळे आहेत उत्तम पर्याय...

1. आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी सांगितले की, कोणतेही काम पूर्ण नियोजन करून केले तर ते पूर्ण होण्यात कोणतीही अडचण (Problem) येत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की, कार्याच्या यशासाठी, पद्धतीइतकी मेहनत महत्त्वाची नसते. एखादे काम सिद्ध करण्यासाठी माणसाने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे ठरवायला हवे. एखादे काम नीट केले तर ते फार कमी वेळात पूर्ण होते हे पाहावे लागेल.

2. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, जर पूर्व नियोजन नसेल तर सुरू केलेले कार्य नष्ट होते. काम करण्यासाठी त्याचा आराखडा बनवायला हवा, त्या आराखड्याचे पालन करण्यासाठी योग्य उपाययोजना ठरवल्या पाहिजेत. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने ते काम करण्यासाठी किती सामर्थ्य आहे हे पाहिले पाहिजे.

Chanakya Niti On Work
Chanakya Niti About Success : आयुष्यात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कधीच होणार नाही फसवणूक

3. आचार्य चाणक्य यांनी जीवनात जी व्यक्ती कामात स्वत:ला सिद्ध करते. त्यांना नियोजनाचा अनुभव असतो. ते कामात अगदी योग्य व्यक्तीची मदत घेतात.

4. कोणतेही काम (Work) सुरू करण्यापूर्वी त्याचा विचार करा. विशेषतः व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य तो विचार करा. एकदा सुरुवात केल्यावर मध्येच थांबू नका. तुमचे काम पूर्ण निष्ठेने करा. बरेच लोक विचारांची देवाणघेवाण करण्यात अयशस्वी होतात. व्यवसाय करताना धीर अधिक महत्त्वाचा असतो. आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यवसाय हा रोपटासारखा असतो. त्याचे झाडात रुपातंर व्हायला वेळ लागतोच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com