Chanakya Niti On Bad Time : आयुष्यात या 3 व्यक्तींची साथ कधीच सोडू नका, कठीण प्रसंगी असतात सगळ्यात पुढे

Chanakya Niti for Bad Phase In Life: सुख आणि दु:ख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू. सुख दिल्याने वाढते तर दु:ख सांगितल्याने कमी होते.
Chanakya Niti On Bad Time
Chanakya Niti On Bad TimeSaam Tv
Published On

Niti Shastra Chanakya : माणसाच्या आयुष्यात चढउतार येतच असतात. हे ही दिवस जातील असं आपण नेहमीच दु:खाच्या प्रसंगी ऐकत आलोच आहोत. सुख आणि दु:ख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू. सुख दिल्याने वाढते तर दु:ख सांगितल्याने कमी होते.

चाणक्यानी सुखी जीवनासाठी अनेक धोरणे सांगितली आहेत. परिस्थितीत स्वतःला हाताळून पुढे कसे जायचे यावर चाणक्यानी आपले विचार मांडले आहेत. चाणक्य सांगतात की जीवनात असे तीन लोक असतात, ज्यांच्यामुळे माणसाला कठीण प्रसंगी धैर्य मिळते. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते 3 लोक ज्यांना कधीही स्वतःपासून दूर ठेवू नये.

Chanakya Niti On Bad Time
Women Body Changes : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांमध्ये होतात हे 8 बदल, सतत राहातात अस्वस्थ

1. पत्नी

संस्कारी आणि समंजस पत्नी (Wife) मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. वाईट काळात पत्नी ही सावलीप्रमाणे पतीच्या पाठीशी उभी असते. लग्नगाठ (Marriage) बांधल्यानंतर घेतले वचनही ती त्यावेळी आनंदाने पूर्ण करत असते. कोणत्याही कठीण प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाते आणि पतीला धैर्याने लढण्याचे बळ देते. संकटाच्या वेळी ती कुटुंबाची ढाल बनते.

2. मुलगा

मुले (Child) ही त्यांच्या पालकांचा आधार असतात. आपल्या मुलाने सद्गुणी व्हावे अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. समाजात त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे नाव मोठे व्हावे असे प्रत्येक पालकाला वाटते. मुलांना सुरुवातीपासूनच योग्य दिशा मिळाली, तर ती म्हातारपणी पालकांची ताकद बनतात. चाणक्याच्या मते ज्यांना असा मुलगा असतो ते कधीही दुःखी होऊ शकत नाहीत. असा मुलगा असल्यामुळे आई-वडील कठीण काळात कधीच एकटे पडत नाहीत.

Chanakya Niti On Bad Time
Fitness Habits at Age 30: महिलांनो, वयाच्या 30 व्या वर्षी 'हे' 6 काम कराच; म्हातारपणी दिसाल तरुण !

3. चांगल्या लोकांची संगत

चांगल्या माणसांची संगत ही आपल्या जीवनाची दिशा ठरवते. चांगल्या माणसांचा सहवास लाभला तर आपण नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. ज्यामुळे आपले आयुष्य आनंदी राहाते. अशी माणसे नेहमी इतरांचे कल्याण करतात. या लोकांचा सहवास कधीही सोडू नका. संकटकाळी ते तुमच्या पाठीशी उभे राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com