पैशाच्या कमतरतेमुळे किंवा आर्थिक संकटामुळे व्यक्तीच्या सर्व योजना उद्ध्वस्त होतात. आपण अस्वस्थ होतो. आचार्य चाणक्य यांच्या मते भौतिक युगात पैशाला विशेष महत्त्व आहे. शिक्षक असण्यासोबतच चाणक्य हे एक अर्थशास्त्रज्ञ देखील होते. पैशाचा माणसाच्या जीवनावर कसा परिणाम होतो? हे आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे.
चाणक्याच्या मते, व्यक्तीने पैसे कमावताना खूप सावध आणि संयम राखला पाहिजे. चाणक्य लक्ष्मीला संपत्तीची देवी मानतात. चाणक्य म्हणतात की, 'जे पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करतात त्यांनाच लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.' पैसे मिळवण्यासाठी व्यक्तीने ही गोष्टी कधीही विसरू नये. अशाच काही शिकवणी पुढील प्रमाणे आहेत.
यश कठोर परिश्रमातून मिळते.
चाणक्यांच्या मते, कष्टाने यश मिळते आणि यश म्हणजे धनाची देवी लक्ष्मीचा नैवेद्य. यशस्वी व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता नसते. म्हणून, कठोर परिश्रम करण्यास कधीही संकोच करू नका. मेहनतीचे फळ नेहमीच गोड असते.
पैसे मिळवण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करा
चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा हा कायमस्वरूपी नसतो. चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा माणसाच्या आयुष्यात वाईट गोष्टींना जन्म देतो. त्यामुळे पैशाच्या बाबतीत माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, योग्य आणि आदर्श मार्गाचा अवलंब करूनच पैसा कमवावा.
अहंकारापासून दूर रहा
धनाची देवी लक्ष्मीला अहंकार आवडत नाही. जे अहंकारी असतात, अशा व्यक्तीला लक्ष्मी लवकर सोडते. म्हणून माणसाने अहंकारापासून दूर राहिले पाहिजे. अहंकारामुळे, व्यक्ती त्याच्या शत्रूंची संख्या वाढवते, जे नंतर त्रासाचे कारण बनते.
Edited By: Sakshi Jadhav