Chanakya Niti About Enemy : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

Human Nature : गोड बोलून काटा काढणारी माणसे आपल्या आयुष्यात नेहमीच कुठे ना कुठे पाहायला मिळतात.
Chanakya Niti About Enemy
Chanakya Niti About EnemySaam Tv
Published On

Chanakya Niti Quotes : आपल्या आजूबाजूला असे अनेक व्यक्ती असतात की, जे आपल्या तोंडासमोर गोड वागतात आणि मागून शत्रूत्व करतात. अशी माणस अधिक घातकच. गोड बोलून काटा काढणारी माणसे आपल्या आयुष्यात नेहमीच कुठे ना कुठे पाहायला मिळतात.

आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, जर आपण आपल्या आयुष्यातील काही गोष्टींवर भर दिला तर आपण अशा माणसांच्या विचारांवर नक्कीच विजय मिळवू शकतो. माणूस हा मुळात वाईट नसतो. वाईट असते ती त्याची वृत्ती. त्यामुळे आपण जे करतो तेच आपल्याला कधी तरी परत मिळते म्हणतात ना Karma is back ! जाणून घेऊया आचार्य चाणक्यांकडून शत्रूवर विजय कसा मिळवायचा ते

Chanakya Niti About Enemy
Chanakya Niti On Friendship : तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये आहेत का अशी माणसे ? वेळीच राहा सावध

1. आत्मनिरीक्षण :

आत्म जागरूकता आणि आत्म चिंतनावर भर दिला आहे. स्वत:ला समजून घेण्यासाठी वेळ काढणे, कमकुवतपणा आणि उद्दिष्टे तुमच्या ताणतणावांना (Stress) अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे प्रभावी मार्ग शोधण्यातही मदत करू शकतात.

2. वेळेचे व्यवस्थापन :

चाणक्याने आपल्या धोरणांमध्ये वेळेचे व्यवस्थापन करायला हवे असे सांगितले आहे. तुमच्या कामांना प्राधान्य द्या. येणाऱ्या तणावाला सामोरे जा. कमी वेळेत काम कसे कराता येईल हे बघा. यामुळे शत्रूवर सहज मिळवता येईल.

Chanakya Niti About Enemy
Chanakya Niti On Bad Time: आयुष्यात संकट येण्यापूर्वी भाग्य देते हे 5 संकेत, चुकूनही करु नका दुर्लक्ष

3. खोडसाळपणा करणारे :

अशा व्यक्तींपासून सावध रहा जे सतत फूट पाडणाऱ्या किंवा हाताळणीच्या वर्तनात गुंततात, ज्यामुळे मित्र किंवा जवळच्या व्यक्तींमध्ये मतभेद होतात. अशी माणसे मतभेदाचे बीज पेरतात आणि अनावश्यक संघर्ष निर्माण करतात त्यांना वेळीच दूर करा.

4. दु:खात साथ देऊ नका :

आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये अशा मित्रांपासून दूर राहण्यास सांगितले आहे जे वाईट वेळी तुमची साथ देत नाहीत. सुखात सर्वजण एकत्र राहतात पण दु:खाच्या वेळी साथ देणारा खरा मित्र हवा.

Chanakya Niti About Enemy
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

5. अलिप्ततेचा सराव करा:

यशासाठी धडपड अधिक आवश्यक आहे. अपयशाच्या भीतीपासून किंवा परिणामांशी जास्त आसक्ती यापासून स्वतःला दूर ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे आपला ताण कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com