Champa Shashti 2023 : चंपाषष्ठी कधी आहे? जाणून घ्या, पूजा विधी, तिथी आणि महत्त्व

Champa Shashti Date 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी ही चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात अनेकांचे देवस्थान हे श्रीखंडोबा. यांच्या पूजेला देखील विशेष महत्त्व असते.
Champa Shashti 2023
Champa Shashti 2023 Saam Tv
Published On

Champa Shashti 2023 Tithi :

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी ही चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात अनेकांचे देवस्थान हे श्रीखंडोबा. यांच्या पूजेला देखील विशेष महत्त्व असते.

चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंडेय रुपाची पूजा केली जाते. भगवान खंडोबा हे भगवान शिवाचा अवतार देखील मानला जातो.

पंचांगानुसार, यावर्षी चंपाषष्ठी व्रत १८ डिसेंबर २०२३, सोमवारी साजरी (Celebrate) केली जाणार आहे. असे मानले जाते की, या दिवशी पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात तसेच अनेक मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊया चंपा षष्ठीचे व्रत, शुभ मुर्हूत आणि पूजा विधी

Champa Shashti 2023
Margashirsha Guruvar Recipe : मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी नैवेद्यात बनवा नारळाच्या दुधातली तांदळाची खीर, झटपट बनेल

1. चंपाषष्ठी व्रत तिथी

पंचागानुसार १७ डिसेंबर २०२३ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील संध्याकाळी ०५.३३ वाजता प्रारंभ होईल. १८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ०३.१३ वाजता संपेल.

  • सकाळी ०७.०७ ते सकाळी ८.२५

  • सकाळी ०९.४२ ते सकाळी ११ वाजता

2. चंपाषष्ठी व्रत योग

सोमवारी, १८ डिसेंबर २०२३ ला चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जाईल. चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. रविवारी किंवा मंगळवारी षष्ठी शतभिषा नक्षत्र आणि वैधृति योग सोबत होणार संयोग अंत्यत शुभ मानला जाणार आहे.

Champa Shashti 2023
Kark Rashi 2024 : नवीन वर्षात कर्क राशीवर शनी देवाची छाया, आर्थिक स्थिती डगमगेल; प्रेमात येईल दूरावा

3. चंपाषष्ठी पूजा पद्धत

  • सकाळी स्नान करुन चंपाषष्ठीचे व्रत करुन भगवान शंकराची पूजा केली जाते.

  • चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात.

  • तसेच या नैवेद्याचा (Food) काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.

  • खंडोबाची तळी भरून आरती करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com