Career Horoscope : तुमच्या कुंडलीतही आहे का? इंजिनिअर, डॉक्टर आणि शिक्षक बनण्याचा योग, कसे कळेल? वाचा सविस्तर

Career Rashi Bhavishya In Marathi : आपल्या कुंडलीनुसार एखादी व्यक्ती भविष्यात इंजिनिअर, डॉक्टर आणि शिक्षक बनू शकते की, नाही. कोणत्या क्षेत्रात जास्त यश मिळवेल हे सांगता येते. अनेकदा युवा पिढी ज्योतिषांकडे त्यांच्या करिअरमध्ये यश कसे मिळेल याविषयी विचारणा करतात.
Career Horoscope, Career Rashi Bhavishya In Marathi
Career Horoscope, Career Rashi Bhavishya In Marathi Saam Tv
Published On

Career Horoscope According To Zodiac :

दहावी बारावीचे पेपर संपल्यानंतर पुढे काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण मार्क्सच्या आधारावर पुढील क्षेत्र ठरवतात तर काहीजण आपल्या कुंडलीच्या आधारे.

अनेकदा युवा पिढी ज्योतिषांकडे त्यांच्या करिअरमध्ये (Career) यश कसे मिळेल याविषयी विचारणा करतात. आपल्या कुंडलीनुसार एखादी व्यक्ती भविष्यात इंजिनिअर, डॉक्टर आणि शिक्षक बनू शकते की, नाही. कोणत्या क्षेत्रात जास्त यश (Success) मिळवेल हे सांगता येते.

जर तुमच्या कुंडलीतील लग्नस्थानात चंद्र असेल तर व्यवसायासंबंधित प्रश्न कळतात. कुंडलीतील चौथ्या घरात शालेय, महाविद्यालयीन प्रात्यक्षिक शिक्षण, द्वितीय घरातून शिक्षण, पाचव्या घरातून स्पर्धा परीक्षा आणि स्मरणशक्ती याविषयीच्या गोष्टी आपल्याला कळतात.

Career Horoscope, Career Rashi Bhavishya In Marathi
Chandra Grahan 2024 : १०० वर्षानंतर होळीला चंद्रग्रहण! या ५ राशी ठरतील लकी, मिळतील नोकरीच्या नव्या संधी

1. डॉक्टर होण्यासाठी कुंडलीतील ग्रह कसे असतील?

यशस्वी डॉक्टर (Doctors) होण्यासाठी सूर्य आणि शनि कुंडलीतील योग्य स्थानी असणे गरजेचे आहे. या दोन्ही ग्रहावर राहू आणि मंगळाचा प्रभाव असणे आवश्यक आहे. जन्मपत्रिकेतील सहावे घर रोग, त्रास आणि दु:खाशी संबंधित आहे. आठव्या किंवा बाराव्या घरात हे ग्रह असतील तर डॉक्टरांच्या व्यवसायाशी संबंधित आहे. कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असेल तर तुम्ही डॉक्टर बनू शकता.

2. इंजिनिअर बनण्यासाठी कुंडलीतील ग्रह कसे असतील?

सूर्य-बुध युतीमुळे बुधादित्य योग तयार होतो. जर याची युती पंचमेश आणि दशमात असेल तर तो व्यक्ती इंजिनिअर बनू शकतो. सूर्य, मंगळ आणि बुध एका राशीत बलवान असल्यास इंजिनिअर किंवा तांत्रिक ज्ञान मिळते. तसेच मंगळ आणि राहूचा संयोग व्यक्तीला इंजिनिअर बनवतो. चंद्र-मंगळ-शनि यांचा संबंध पाचव्या किंवा दहाव्या घराशी असेल तर ती व्यक्ती इंजिनिअर बनू शकते.

Career Horoscope, Career Rashi Bhavishya In Marathi
Holi 2024 : होळीच्या पूर्वी घराबाहेर फेका या गोष्टी, पैशांची चणचण होईल दूर

3. उच्च शिक्षणासाठी योग

कुंडलीत गुरु पंचमेश संबंधित असेल, केंद्र किंवा त्रिकोणात असेल तर ती व्यक्ती उच्च शिक्षित असते. पंचमेश बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने मध्यभागी किंवा त्रिकोणात असल्यास बुध स्वराशीत असेल. चौथ्या किंवा पाचव्या राशीत असेल तसेच नवव्या भावात बुध, शुक्र आणि गुरु यांचा संबंध असल्यास उच्च शिक्षणाच्या संधी मिळतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com