Akshaya Tritiya 2023 Offers : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करा, मोफत सोन्याच्या नाण्यावर बंपर सवलत मिळवा; कुठे आणि कसं? जाणून घ्या

Akshaya Tritiya Festival : अक्षय्य तृतीया या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
Akshaya Tritiya 2023 Offers
Akshaya Tritiya 2023 OffersSaam Tv

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया सण जवळ आला आहे. या महिन्यात म्हणजेच 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते.

हा सण जवळ आला की सोन्याची मागणी वाढते. यासोबतच सोन्याच्या दुकानांवरही मोठी गर्दी दिसून येते. या दिवशी लोक सोन्याच्या (Gold) दागिन्यांपासून अनेक गोष्टींची खरेदी करतात, परंतु अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी सर्वाधिक होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोन्याला आपण संपत्ती (Wealth) मानतो. म्हणूनच सोन्यात गुंतवणूक करणे चांगले मानतो.

Akshaya Tritiya 2023 Offers
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला घर खरेदी करताय ? वास्तूशास्त्राबद्दल हे नियम आधी जाणून घ्या

तुम्हीही अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सोन्याचा भाव सातव्या गगनाला भिडला आहे. अशा परिस्थितीत, अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने अनेक मोठ्या ज्वेलर्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर डिस्काउंट ऑफर (Offer) आणल्या आहेत.

या अंतर्गत कोणी सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर बंपर डिस्काउंट देत आहे, तर कोणी सोन्याच्या खरेदीवर मोफत सोन्याचे नाणे देत आहे. या अक्षय्य तृतीयेला सोन्याची नाणी, विटा, दागिने इत्यादी खरेदी करण्यापूर्वी या ऑफर आणि सवलतींबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याच्या मदतीने तुम्ही कमी खर्चात सोन्यात मोठी गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊया या ऑफर्सबद्दल...

Akshaya Tritiya 2023 Offers
Akshaya Tritiya 2023: कधी आहे अक्षय्य तृतीया?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजनाची पद्धत!

अक्षय्य तृतीयेला मोफत सोन्याचे नाणे कसे मिळवायचे ते जाणून घ्या -

Malabar Gold and Diamonds Akshaya Tritiya 2023 Offers -

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने, ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या शुल्कावर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. एवढेच नाही तर 30,000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने खरेदी केल्यास तुम्हाला 100 मिलीग्राम सोन्याचे नाणे मोफत दिले जात आहे. तुम्ही 30 एप्रिल 2023 पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Tanishq Akshaya Tritiya 2023 Offers -

ग्राहकांना अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शुल्क आकारण्यावर 25 टक्क्यांपर्यंत भरघोस सूट देत आहे. तुम्ही 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023 पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Akshaya Tritiya 2023 Offers
Akshaya Tritiya: सोने खरेदीचा साधला मुहूर्त

PC Chandra Jewellers Akshaya Tritiya 2023 Offers -

दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर 15 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरद्वारे तुम्ही 26 एप्रिल 2023 पर्यंत स्वस्त दरात सोन्याचे दागिने खरेदी करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com