Akshaya Tritiya 2023: कधी आहे अक्षय्य तृतीया?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजनाची पद्धत!

Akshaya Tritiya 2023 Date : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या (Akshaya Tritiya 2023) दिवशी शुभ कार्य केले जाते.
Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023Saam Tv

Akshaya Tritiya: हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) या सणाला विशेष महत्व आहे. वर्षातील चार शुभ मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या (Akshaya Tritiya 2023) दिवशी शुभ कार्य केले जाते. असे म्हटले जाते की, या दिवशी एखादे काम केले तर यश मिळते.

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला घर खरेदी करताय ? वास्तूशास्त्राबद्दल हे नियम आधी जाणून घ्या

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी गृहप्रवेश, सोने खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी किंवा मुंडन असे अनेक शुभ कार्यक्रम मुहूर्त न बघता केले जातात. महत्वाचे म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान धर्माला विशेष महत्व आहे. अक्षय तृतीया कधी आहे, त्याचे महत्व आणि पूजनाची योग्य पद्धत काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत...

Akshaya Tritiya 2023
Effect Of Plants On Humans : घराची शोभा वाढवणारी झाडे, तुमची मनस्थितीही सुधरवते...

अक्षय तृतीया 2023 कधी आहे -

अक्षय्य तृतीया येत्या शनिवारी म्हणजेच 22 एप्रिल 2023 रोजी आहे. हिंदु पंचांगानुसार, अक्षय तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.49 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.47 वाजेपर्यंत असणार आहे.

Akshaya Tritiya 2023
Gold-Silver Price : सोन्याचे भाव पुन्हा घसरले, अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्याची सुवर्धसंधी ! जाणून घ्या आजचे दर

अक्षय तृतीया 2023 पूजनाचा शुभ मुहूर्त -

अक्षय तृतीयाच्या दिवशी पुजेला विशेष महत्व आहे. या दिवशी पूजनाचा शुभ मुहूर्त 23 एप्रिल 2023 ला सकाळी 7.49 वाजल्यापासून सुरु होईल. तो दुपारी 12.20 वाजेपर्यंत असणार आहे.

अक्षय तृतीया 2023 खरेदीचा शुभ मुहूर्त -

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने, वाहन, घर खरेदी केली जाते. या खरेदी करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा 22 एप्रिल 2023 ला सकाळी 7.49 वाजल्यापासून सुरु होतो. तर 23 एप्रिल 2023 ला सकाळी 7.47 वाजेपर्यंत असेल.

Akshaya Tritiya 2023
Gold Silver Price Hike : सोनं पुन्हा महागलं ! मागील अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत मोजावे लागणार तब्बल 10 हजार जास्त

अक्षय तृतीया 2023 पूजन पद्धत -

आजच्या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे कपडे घालावेत. यानंतर धूप आणि तुपाचा दिवा लावून पिवळ्या आसनावर बसावं. तुळशीची पूजा करा आणि पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. तसंच आजच्या दिवशी विष्णु सहस्रनाम, विष्णू चालीसा म्हणावी. तसंच विष्णूंची आरती देखील करावी. यासह जर पूजा करणाऱ्यांने एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास ते देखील खूपच चांगले मानले जाते.

(डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com