Budh Shukra In September : ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. येत्या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि ग्रह संक्रमण करणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्ती आणि वैभवाचे प्रतिक शुक्र हे दोघेही मार्गस्थ होणार आहेत.
दोन्ही राशींचा प्रभाव सर्व १२ राशींवर वेगवेगळा असेल, पण ४ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे राशीचे भाग्य उजळेल. या संक्रमणामुळे त्या राशीच्या लोकांना अचानक कुठूनतरी धन मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये मालमत्तेची किंवा वाहनाची खरेदी होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
2. मिथुन
शुक्राच्या प्रभावाने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या बोलण्याने इतरांवर प्रभाव टाकण्याच्या स्थितीत असाल. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. व्यवसायात गुंतलेल्यांना अचानक दिलेले पैसे परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अनेक नवीन यश (Success) मिळवाल.
3. तूळ
शुक्र संक्रमणामुळे खाजगी किंवा सरकारी नोकरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता. त्यात तुम्हाला फायदा होईल. तुम्ही घर शिफ्ट करण्याचाही विचार करू शकता.
4. वृश्चिक
कामाशी संबंधित बाबींसाठी तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. कोर्टात सुरू असलेली प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाची संधी आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे सप्टेंबरमध्ये पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला पैसे मिळू शकतात. कुटुंबासोबत प्रवासाची शक्यता आहे.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.