BSNL New Plan : BSNL चा नवा प्लान ! 50 रुपयात पाहाता येणार Hotstar, Zee5 सारखे OTT Subscription...

BSNL Cinema plus : भारत संचार निगम लिमिटेड ने आपल्या ग्राहकांसाठी Cinema plus नावाचे OTT ची सुविधा सुरु केली आहे.
BSNL New Plan
BSNL New PlanSaam Tv

BSNL New OTT Plan : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी Cinemaplus नावाचे OTT ची सुविधा सुरु केली आहे. ओटीटी सेवाचा आनंद घेण्यासाठी रिपोर्टनुसार BSNL ने Lionsgate, Shemaromi, Hungama आणि Epicon यासह अनेक OTT प्लॅटफॉर्मसह पार्टनरशीप केली आहे.

BSNL Cinema Plus ही पूर्वीच्या युप्पटीव्ही स्कोपची पुनब्रँडेड आवृत्ती आहे जी वापरकर्त्यांना रु. 249 प्लान ऑफर (Offer) करत होती. आता ती Cinemaplus वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार निवडण्यासाठी ऑफर देणार आहे. यामध्ये BSNL ने OTT प्लॅटफॉर्म तीन नव्या ऑफर्स दिल्या आहेत. या ऑफर ४९ रुपयांपासून (Offer) सुरु होत असून ते २४९ रुपयांपर्यंत आहेत. जाणून घेऊया कसा घेता येईल लाभ

BSNL New Plan
Aadhar Card Download : आधार कार्ड हरवले आहे ? १४ अंकी नंबरही लक्षात नाही ? कसे कराल डाउनलोड

1. 49 रुपयांच्या बेस प्लॅनमध्ये ShemarooMe, Hungama, Lionsgate आणि Epicon याचे Subscription घेता येईल. यापूर्वी या प्लानची (Plan) किंमत 99 रुपये इतकी होती.

2. Cinemaplus फुल पॅकमध्ये Zee5 Premium, SonyLiv Premium, YuppTV आणि Hotstar याचे Subscription घेता येईल. या प्लानची ​​किंमत 199 रुपये इतकी आहे.

3. प्रीमियम पॅकची किंमत 249 रुपये आहे आणि Zee5 प्रीमियम, SonyLiv प्रीमियम, YuppTV, ShemarooMe, हंगामा, Lionsgate आणि Hotstar ऑफर आहेत.

BSNL New Plan
WhatsApp Chat Lock Feature: व्हॉट्सअ‍ॅपच नव अपडेट ! आता चॅट ही करता येणार लॉक, कसे कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

4. Cinemaplus सेवा कसे काम करते?

  • Cinemaplus वापरण्यासाठी वापरकर्त्यांना सक्रिय BSNL फायबर कनेक्शन आवश्यक आहे

  • त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार त्या योजनांपैकी एक सक्रिय करणे आवश्यक आहे.

  • योजना सक्रिय झाल्यानंतर, सर्व सदस्य नोंदणीकृत फोन नंबरशी जोडले जातील.

  • जे सक्रिय योजनेचा भाग आहेत ते प्लॅटफॉर्मवर उपलब्ध सामग्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी फोन नंबर वापरू शकतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com