Cibil Score For Marriage: कर्जाचे हप्ते थकल्याने मुलांची लग्न रखडली? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Bride Parents Check Grooms Cibil Score: मुलीचे पालक मुलीचं लग्न करण्याआधी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा सिबिल स्कोअर तपासत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Cibil Score For Marriage
Bride Parents Check Grooms Cibil Scoresaam tv
Published On

आता बातमी आहे लग्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची.कारण, तुम्हाला लग्न करायचं असेल तर सिबिल स्कोर चांगला ठेवावा लागेल.नाहीतर लग्नाला मुलगी मिळणार नाही असा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

आपलं लग्न वेळेत व्हावं, आपल्याला सुंदर मुलगी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते...मात्र, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलांची लग्न रखडलीयत.म्हणे सिबिल खराब असल्याने मुलींनी लग्नास नकार दिलाय. थोडक्यात काय तर घेतलेल्या कर्जाचा हप्ते चुकल्याने काहींना लग्नास मुली मिळत नाहीयेत. होय, हे आम्ही म्हणत नाही. तर तसा मेसेज व्हायरल होतोय. काय मेसेजमध्ये दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

सिबिल खराब असल्यामुळे अनेकांचं घराचं स्वप्नं तुटल्याचं तुम्ही अनेकांनी पाहिलं आणि ऐकलं असेल. मात्र, महाराष्ट्रात सिबिल खराब असल्याने अनेकांना मुलींनी लग्नास नकार दिला. मात्र सिबिल काय आहे हे आधी आपण जाणून घेऊयात.

Cibil Score For Marriage
Hug Day 2025: आयुष्यात पहिल्यांदाच मुलीला 'हग' करणार आहात? 'या' टिप्सने क्षण करा स्पेशल!

सिबिल म्हणजे काय?

कर्ज घेण्यापूर्वी सिबिल तपासला जातो

बँका ग्राहकांच्या क्रेडिटची माहिती ब्युरोकडे पाठवतात

सिबिल, क्रेडिटशी निगडीत सीआयआर जारी करतो

ग्राहकांना एक क्रेडिट स्कोअर दिला जातो.

सिबिल स्कोर काय हे कळलं. मात्र, मेसेज कुणी व्हायरल केलाय.खरंच असं कोणत्या जिल्ह्यात सिबिल खराब असल्यामुळे लग्न होत नाहीयेत का? याची पडताळणी करणं गरजेचं आहे.हा मेसेज अकोल्यातील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळींनी गाव शोधून काढलं. ते थेट मूर्तिजापूरात पोहोचले आणि खरंच सिबिलमुळे मुलांना मुली कुणी देत नाही का? हे जाणून घेतलं.

Cibil Score For Marriage
Propose Day : क्रशला प्रपोज करणार आहात? अजिबात 'या' चुका करू नका, अन्यथा...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

सिबिलमुळे अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये लग्न तुटलं

सिबिल खराब असल्याने लग्नास मुली तयार होत नाही

सिबिलवरून आर्थिक स्थिती ठरवल्याचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com