Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचं निदान आता स्वस्तात होणार, IIT इंदूरमध्ये स्वदेशी उपकरण तयार, कोट्यवधी महिलांना होणार फायदा

Breast Cancer Diagnostic Tool : ब्रेस्ट कॅन्सरचे झटपट निदान व्हावे यासाठी IIT इंदूरमध्ये स्वदेशी उपकरण तयार करण्यात आले आहे. यामुळे लाखो महिलांचे प्राण वाचणार आहेत.
Breast Cancer Diagnostic Tool
Breast Cancer Saam TV
Published On

महिलांमधील स्तन कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २०२२ मध्ये जगभरात ६,७०,००० स्तन कॅन्सरच्या रुग्णांची नोंद झाली होती. कॅन्सरने भारतात दरवर्षी ५० हजार महिलांचा मृत्यू होत आहे. तर ४ मिनिटांनंतर एका महिलेमध्ये स्तन कॅन्सरचे निदान होताना दिसत आहे. या आजाराने महिलांमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. अशात ब्रेस्ट कॅन्सरमधून वाचण्यासाठी एका महत्वाच्या उपकरणाचा शोध लागल्याची माहिती मिळाली आहे.

Breast Cancer Diagnostic Tool
Chest Lump in Periods : मासिक पाळीदरम्यान स्तनांमध्ये गाठ का होते? कॅन्सरच्या धोक्याबाबत तज्ज्ञांचं स्पष्टीकरण

आयआयटी इंदूरच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमध्ये महिलांना ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही हे ओळखण्याचं एक यंत्र बनवण्यात आलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ला हे यश आलं आहे. आयआयटी इंदूरच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक श्रीवत्सन वासुदेवन यांनी या उकरणाचा शोध लावला आहे.

या उपकरणामुळे स्तनाचा कर्करोग आहे की नाही हे पटकन ओळखता येतं. ग्रामीण भागातील अनेक महिलांना आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे की नाही हे पटकन समजत नाही. त्रास जास्त जाणवू लागला की, महिला रुग्णालयात उपचारासाठी जातात. मात्र तोवर बराच उशीर झालेला असतो. यामुळे आजवर अनेक महिलांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर असल्यास त्याचे लगेचच निदान व्हावे आणि महिलांची या आजारातून सुटका व्हावी यासाठी हे उपकरण काम करणार आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलांच्या स्तनांची त्वचा राठ होते.

स्तनावर खळी सदृश्य खाच दिसू लागते.

स्तनाग्राभोवतीची त्वचा तहकणे आणि दुखते.

स्तनाग्रातून स्त्राव होतो. तसेच खाज येणे आणि वेदना होणे या समस्या जाणवतात.

ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणारं उपकरण IIT इंदूरमध्ये तयार

Breast Cancer Diagnostic Tool
Breast Cancer : 'ही' लक्षणे दिसताच सावधान! तुम्हालाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com