Chest Lump in Periods : मासिक पाळीदरम्यान स्तनांमध्ये गाठ का होते? कॅन्सरच्या धोक्याबाबत तज्ज्ञांचं स्पष्टीकरण

Chest Lump in Periods : मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात काहीसे बदल दिसून येतात. अशावेळी अनेक महिलांना स्तनांमध्ये गाठ होण्याची समस्याही सतावते.
Chest Lump in Periods
Chest Lump in Periodssaam tv
Published On

मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात काहीसे बदल दिसून येतात. यावेळी पोट फुगणं, स्तनांमध्ये वेदना होणं तसंच स्तनांचा आकार बदलणं असे बदल महिलांच्या शरीरात होतात. मात्र मासिक पाळीदरम्यान महिलांना अजून एका समस्येला सामोरं जावं लागतं ते म्हणजे, स्तनांमध्ये गाठी होणं.

मासिक पाळीदरम्यान स्तनांमध्ये गाठ होणं

मासिक पाळीवेळी महिलांना भावनिक आणि शारिरीक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी अनेक महिलांना स्तनांमध्ये गाठ होण्याची समस्याही सतावते. स्तनांमध्ये होणार्‍या या गाठी किती गंभीर असू शकतात किंवा या गाठी होण्यामागे नेमकं कारण काय आहे, हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, मासिक पाळीवेळी महिलांच्या स्तनांमध्ये हार्मोनल बदलामुळे गाठी होतात. या काळात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात. हे बदल स्तनांमधील ग्रंथीवर प्रभाव टाकतात. ज्यामुळे गाठ होण्याची शक्यता वाढते.

Chest Lump in Periods
Detox Body: तुमच्या शरीरात टॉक्सिन आहे? 'हे' बदल दिसल्यास समजून जा शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आलीये

यासंदर्भात फोर्टिस रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संगीता रावदेव म्हणाल्या की, हार्मोनल बदलांमुळे अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान स्तनात गाठी येण्याचा समस्या जाणवू शकते. मासिक पाळी सुरू होण्याआधी स्तन अनेकदा गाठी, स्तन सुजणं किंवा त्यामध्ये वेदना होणं ही तक्रार उद्भवते.

कॅन्सरचा धोका उद्भवतो का?

डॉ. संगीता पुढे म्हणाल्या की, हा त्रास प्रामुख्याने फायब्रोसिस्टिक breast disease असलेल्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. ही एक अशी स्थिती असते, ज्यामध्ये महिलांना कॅन्सरचा धोका नसतो. जर तुमच्या मासिक पाळीच्या नंतर एक आठवड्यानंतरही अशा पद्धतीची गाठ कायम राहिली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

खारघरच्या मदरहूड रूग्णालयातील स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. अनुजा थॉमस यांनी सांगितलं की, प्रेग्नेंसी झाल्यानंतर किती दिवस रक्तपात होतो या समस्येच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, जसं तुम्हाला मासिक पाळी मध्ये ब्लिडींग होतं तसंच प्रेग्नेंसी नंतर होतं. नॉर्मल डिलिवरी नंतर एक आठवड्याभर ब्लिडींग जास्त होतं. त्यानंतर नेहमी सारखाच नॉर्मल त्रास होतो. पण जर तीन तासाला तुम्हाला तुमचे पॅड बदलावं लागत असेल तो स्त्राव योग्य नाही. त्याने तुम्हाला भविष्यात त्रास होउ शकतो त्यासाठी तुम्ही डॉक्टरानचा सल्ला घ्यायला हवा

गरोदर पणात ब्रेस्ट इन्फेकशन या समस्येला सुद्धा समोर जावं लागू शकतं. ब्रेस्ट मिल्क योग्य वेळी बाहेर न गेल्याने अनेक इन्फेकशन होण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही paracetamol या मेडिसिनचा वापर करू शकता. Calcium ची कमतरता असते त्यासाठी सुद्धा मेडिसिन घेऊ शकता.त्याने बाळाला सुद्धा योग्य पोषक तत्व मिळतात, असंही डॉ. अनुजा यांनी सांगितलं आहे.

मासिक पाळीमध्ये स्तनांमध्ये गाठ होण्याची सामन्य कारणं

  • हार्मोन्सच्या पातळीत बदल झाल्याने शरीरात लिक्विड रिटेनशन होऊ शकते, ज्यामुळे स्तनांना सूज येण्याची किंवा गाठीची समस्या उद्भवते.

  • प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोममध्ये देखील स्तनांमध्ये वेदना होऊ शकतात. यावेळी गाठ होण्याचीही शक्यता असते.

  • फाइब्रोसिस्टिक ब्रेस्टमुळे स्तनांचे टिश्यू मऊ होऊन त्यामध्ये गाठ होण्याची शक्यता असते.

Chest Lump in Periods
मोबाइलच्या वापरामुळे ब्रेन कॅन्सर होतो का? WHO च्या अभ्यासातून सत्य समोर!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com