Immunity Boost: आहारात या 3 पदार्थांचा करा समावेश, रोगप्रतिकारक शक्ती अन् Metabolism वाढेल; डॉक्टरांनी दिला सल्ला

Winter Wellness: हिवाळ्यात बाजरी, आवळा आणि तीळ आहारात घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, मेटाबॉलिझम सुधारतो आणि पचनसंस्था मजबूत राहते, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.
Winter Wellness
Immunity Boostgoogle
Published On

सध्या धावपळीच्या जीवनात अनेकांचं जेवणाकडे दुर्लक्ष होतं. महिला आणि पुरुष हे दोघेही कामानिमित्त घराबाहेर असतात. रात्री फक्त विश्रांतीसाठी घरी जातात. अशातच काहीवेळेस त्यांना कामाचा ताण येतो. तेव्हा लोक बाहेरुन खाणं ऑर्डर करतात किंवा थेट हॉटेलमध्ये फॅमिलीच जेवायला जाते.

अर्थात हॉटेलमध्ये गेल्यावर कोणीच पौष्टीक पदार्थ खात नाही. त्यावेळेस लोक जंक फूड खाणं पसंत करतात. पण याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत असते. पुढे डॉक्टरांच्या सल्यानुसार काही टिप्स दिल्या आहेत. त्यानुसार आपण आहार घेतल्याने अनेक छोट्या-मोठ्या आजारांपासून आपण लांब राहू शकतो.

थंडीत आहारात बदल करणं हा आपल्या आई-आजींकडून मिळालेल्या पारंपरिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ऋतूनुसार योग्य आहार शरीराला आवश्यक त्यावेळेस हवे असणारे पोषण देतो आणि वेगवेगळ्या सप्लिमेंट्सवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते, असं मत दिल्लीतल्या फोर्टिस हॉस्पिटलमधल्या डॉ. शुभम वात्स्य यांनी व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी हिवाळ्यासाठी आतड्यांचं आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि चयापचय सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या पारंपरिक पदार्थांचा वापर करण्याची सक्ती केली आहे.

Winter Wellness
Colorectal Cancer Diet: खाण्यापिण्याच्या बदलामुळे होऊ शकतो 'आतड्याचा कॅन्सर', आत्ताच 'हे' पदार्थ खाणं सोडा

डॉक्टरांच्या मते, हिवाळा हा शरीरात उष्णता आणि स्थिरता निर्माण करणारे अन्न खाण्याचा काळ आहे. यामध्ये मिलेट्स म्हणजेच भरड धान्यांचा समावेश महत्त्वाचा आहे. तुम्ही बाजरी खाऊ शकता. कारण ती उष्ण असते. त्याने पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि रक्तामध्ये वाढणारी साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यातले लोह आणि मॅग्नेशियम हिवाळ्यातील थकवा आणि स्नायूंचं दुखणं कमी करतात.

याशिवाय आवळा हा नैसर्गिक व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असतो. याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, आतड्यांचं संरक्षण होतं आणि हिवाळ्यात होणारी सूज कमी होते. तसेच तीळामध्ये असलेले चांगले फॅट्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडं व सांधे मजबूत होतात. तरचा कोरडेपणा सुद्धा कमी होतो. त्यामुळे हिवाळ्यात पारंपरिक, ऋतुनुसार अन्नाचा समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Winter Wellness
Acidity and Gas: कोणते पदार्थ खाल्ल्याने पोटात Acidity आणि गॅस तयार होतो?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com