वयाच्या पन्नाशींनंतर महिलांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका बळावतो. ऑस्टियोपोरोसिसमुळे हाडं कमकुवत होतात ज्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. या हाडांच्या समस्यांमध्ये हाडांची घनता आणि हाडं ठिसूळ होतात. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियम आणि प्रोटीन यांची म्हणजेच ‘बोन मिनरल डेन्सिटीची’ झालेली कमतरता असते.
लीलावती रूग्णालयातील नी आणि हिप सर्जन डॉ. अलोक पांडे यांनी सांगितलं की, ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडं इतकी ठिसूळ होतात की किरकोळ अपघातातही फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ऑस्टियोपोरोसिसचा सर्वात जास्त परिणाम पाठीचा कणा, खुबा व मनगटाची हाडे यांच्यावर होतो. ओस्टियोब्लास्ट आपल्या शरीरात ब्लॉक ची निर्मिती व हाडांवर कॅल्शियमचा थर जमा करणे. तर ऑस्टियोक्लास्ट्स हे शरीराच्या आवश्यकतेनुसार हाडांमधील कॅल्शियम काढून टाकण्याचं काम करतं.
आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ऑस्टियोबालास्ट अधिक एक्टिव्ह असतात ज्यामुळे हाड तयार होतो. प्रौढतेमध्ये ओस्टियोबास्ट आणि ऑस्टियोक्लास्ट दोन्ही समान प्रमाणात स्थिती राखत असतात. परंतु नंतरच्या टप्प्यात संतुलन ओस्टियोक्लास्ट्सचे अधिक प्रमाणात बदलते ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसची वाढ होते.
रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमधील हार्मोनल असंतुलन आणि इस्ट्रोजेनची पातळी कमी होणे.
त्वचेच्या आजारांसाठी किंवा स्वयंप्रतिकार रोगांसाठी दीर्घकाळ स्टिरॉइडचे सेवन करणाऱ्या रुग्णांना ऑस्टिओपोरोसिस तसेच अव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN) होण्याची शक्यता असते.
केमोथेरपी आणि रेडिओथेरपीनंतर रूग्णांमध्ये हाडांची झीज होण्याची शक्यता जास्त असते ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चर्स होतात.
बैठी जीवनशैली असलेल्या वृद्ध लोकांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते.
या समस्येच्या सुरुवातीच्या टप्प्यात ऑस्टिओपोरोसिसची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
रात्रीच्या वेळी तीव्र वेदना ही ऑस्टिओपोरोसिसचे महत्त्वाचे लक्षण आहे.
पाठदुखी ही औषधांना प्रतिसाद देत नाही
वृद्धांमध्ये उंची कमी होणे
लक्षणीय इजा न होता फ्रॅक्चर होणं.
ऑस्टियोपोरोसिसचा सर्वोत्तम उपचार म्हणजे प्रतिबंध. पोस्टमेनोपॉझ महिलांनी नियमित कॅल्शियमचं सेवन करणं, नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रशिक्षण घ्यावं. यामधील उपचार सहसा बोन मिनरल डेन्सिटीच्या तपासणीने केला जातो. जर बीएमडी स्कोअर खूप कमी असेल, तर रुग्णाला ऑस्टियोपोरोसिसच्या व्यवस्थापनासाठी इंजेक्शन, थेरपीची आवश्यकता भासते जसे की टेरिपॅरेटाइड किंवा डेनुसुमॅब.
डॉ. अलोक पुढे म्हणाले, मध्यम पातळी असलेल्या रुग्णांना D3 आणि व्यायामासह कॅल्शियमचे सतत सेवन करणं गरजेचं आहे. सौम्य पातळीस केवळ फिजिओथेरपीची आवश्यकता भासते. बहुतेकदा हिप फ्रॅक्चरची सारख्या प्रकरणात रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. विविध प्रकारच्या हिप फ्रॅक्चरसाठी योग्य पर्याय हे तुमचे सर्जन ठरवतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.