Parenting Tips : 'या' ५ गोष्टी प्रत्येक मुलांना आपल्या आई-वडिलांकडून ऐकायच्या असतात

Parenting Tips for Child : मुलांना सर्वात जवळचे असतात ते आई वडिल. त्यामुळे पालकांकडून मुलांना अनेक अपेक्षा असतात. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
Parenting Tips for Child
Parenting TipsSaam TV
Published On

आपलं मुल सर्वात हुशार आणि मेहनती असावं त्याने कुठेही कोणतीही चूक करू नये असं प्रत्येक पालकांना वाटतं. त्यामुळे पालक अनेकदा आपल्या मुलांना बोलतात आणि ओरडतात. मुलं लहान असली तरी त्यांना भावना असतात. पालकांनी ओरडल्यावर त्यांना प्रचंड वाईट वाटते. या गोष्टी त्यांच्या मनाला लागतात. मुलं आणि पालक यांमधील नातं इतकं छान आणि सुंदर असायला हवं की मुलं पालकांना सर्व काही न घाबरता सांगू शकतील.

Parenting Tips for Child
Parenting Tips : मुलं वाचलेलं लगेच विसरून जातात? न ओरडता करा 'हे' उपाय, सगळं तोंड पाठ होईल

मुलांना या गोष्टी आवडत नाहीत

पालकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मुलांना आवडतीलच असं नाही. काही गोष्टी मुलांना आवडत नाहीत, त्यावर त्यांचं वेगळं मत असतं. असे असेल तेव्हा पालकांनी मुलांना इतकी मोकळीक दिली पाहिजे की, एखाद्या विषयावर मुलांना त्यांचे विचार मांडता येतील. प्रत्येक मुलाला आपल्या पालकांकडून याची अपेक्षा असते

आई-बाबा मला समजून घेतील

सध्या प्रत्येक घरात आई आणि वडिल दोघेही नोकरी करतात. त्यामुळे मुलांना त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. तसेच मुलांनी काही सांगितले तरी पालक कामाच्या व्यापात या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने मुलांचे मन दुखावले जाते. मुलांना वाटतं की आपल्या आईने आणि बाबांनी आपल्याला पुरेपूर वेळ द्यावा आणि आपल्याला समजून घ्यावे.

चुक झाल्यास माफ करावे

लहान मुलांकडून अनेक चुका होत असतात. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा हाती घेतल्यावर वस्तू पडणे, फुटणे नुकसान होणे या गोष्टी घडतातच. अशावेळी मुलांना आपल्या पालकांकडून अशी अपेक्षा असते की ते यावर न ओरडता समजून घेतील आणि झालेल्या चुकीवर आपण मोठा गुन्हा केला आहे अशा पद्धतीने वागणार नाहीत. मात्र काही ठिकाणी मुलांच्या शुल्लक चुकांवर त्यांना ओरडले जाते.

हट्ट पूर्ण करावेत

लहान मुलं फार हट्टी असतात. त्यांनी एकदा का एखादी गोष्ट पाहिली की आपल्या आई बाबांनी ती आपल्याला काही करून घेऊन द्यावी असं मुलांना वाटत असतं. अशावेळी तुम्ही मुलांना आपल्या आर्थिक स्थिती बद्दल सांगितले पाहिजे. तसेच मुलांचे हट्ट पूर्ण करताना आपल्याला किती मेहनत करावी लागते याची त्यांना जाणीव करून द्यावी.

Parenting Tips for Child
Parenting Tips: मुलांशी सतत कडाक्याचं भांडण होतय? 'या' ४ गोष्टी नक्की करा ट्राय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com