फोटो एडिट करण्यासाठी बाजारात अनेक अॅप उपलब्ध आहेत. तुमची फोटोग्राफी सुधारण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. सामान्य वापरकर्ते असोत किंवा व्यावसायिक छायाचित्रकार असोत, कोणीही या फोटो एडिटिंग अॅप्सचा लाभ घेऊ शकतो. फोटो एडिटिंगसाठी कोणते अॅप्स चांगले आहेत, त्याची माहिती घेऊया. (Latest News)
केवळ व्यावसायिकच नाही तर सामान्य लोकही फोटोग्राफीसाठी एडिटिंग अॅप्स वापरतात. आता येणाऱ्या नवीन स्मार्टफोन्समध्ये दमदार कॅमेरा फीचर्स असतात. हे केवळ उत्कृष्ट फोटोच घेत नाही तर त्याची गुणवत्ता देखील चांगली राहते. जर तुम्ही एडिटिंगचे अॅप्सचा वापर केला तर त्या फोटोंना अजून तुम्ही प्रोफेशनल टच देऊ शकतो.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Snapseed: तुम्ही Snapseed मध्ये सर्वोत्तम फोटोग्राफी करू शकता. यात टॉप लेव्हल एडिटिंग टूल्स, एडिट ब्रशेस, फिल्म-संबंधित फिल्टर्स सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. स्नॅपसीडचा वापर बारीकसारीक माहितीसाठी केला जाऊ शकतो. रंग, कॉन्ट्रास्ट, इफेक्ट वापरून फोटो सुधारता येतात.
Adobe Photoshop Camera: अॅडोब फोटोशॉप कॅमेऱ्याची खासियत म्हणजे त्यात एआयचा फायदा आहे. जेव्हा तुम्ही कॅमेराने शॉट घेत असतात तेव्हा स्पेशल इफेक्ट्स आणि फिल्टर्स तुमचे फोटो आकर्षक बनवतात. हे अॅप वापरणेही खूप सोपे आहे.
Pixlr: सामान्य वापरकर्ते या अॅपद्वारे आश्चर्यकारक फोटो एडिटिग देखील करू शकतात. फोटो अॅडजस्टमेंट टूल्स, ब्रशेस, स्पेशल इफेक्ट फिल्टर्ससह फोटोंना प्रोफेशनल टच दिला जाऊ शकतो. पूर्व-निर्मित मांडणी, कोलाज तयार करणे आणि डिझाइन टेम्पलेट्स तुम्हाला तुमची फोटोग्राफी सुधारण्यास मदत करत असते.
Canva: कॅनव्हा हे एक उत्तम फोटो एडिटर अॅप असून तुम्ही याद्वारे उत्कृष्ट ग्राफिक्स तयार करू शकता. तुम्ही फोटो एडिटिंग आणि आकर्षक सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यासाठी याचा वापर करू शकता. तुम्ही तुमची कलात्मकता त्याच्या टूल्स, इफेक्ट्स आणि फीचर्सद्वारे दाखवू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.