
स्मार्टफोन ही काळाची गरज आहे. आजकाल लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करत असतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स लॉन्च होतात. पण जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला चांगला स्मार्टफोन हवा असेल, तर तुम्ही ई-कॉमर्स साइट फिल्पकार्टवरुन उत्तम फोन खरेदी करु शकता. आम्ही तुम्हाला 10,000 रुपये किंमत असलेले 5G स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत.
1. Infinix Hot 50 5G हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन मानला जातो. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. या फोनची Flipkart वर किंमत फक्त 9,499 रुपये आहे. ICICI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे भरल्यास, तुम्हाला स्मार्टफोनवर 500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकेल. त्यामुळे या फोनची किंमत 8,999 रुपये होईल.
2. itel P55 5G हा देखील सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारा फोन आहे असे मानला जातो. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. त्याची किंमत 8,990 रुपये आहे. BOBCARD वररुन EMI व्यवहार केल्यास तुम्हाला 10% पर्यंत म्हणजेच सुमारे 900 रुपयांची सूट मिळू शकेल. त्याने या फोनची किंमत 8,099 होईल.
3. Tecno Spark 30C 5G हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनची Flipkart वर किंमत 9,999 रुपये आहे. HDFC बँक कार्डने खरेदी केल्यास 750 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. परिणामी याची किंमत 9,249 होईल.
4. Poco C75 5G हा फोनदेखील बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या यादीत येतो. या फोनची Flipkart वर किंमत फक्त 7,999 रुपये आहे. IDFC FIRST बँक डेबिट कार्डद्वारे पैसे भरल्यास 750 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 7,599 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
5. स्वस्तात मस्त फोनच्या यादीत Motorola G35 5G चा देखील समावेश होतो. याची किंमत 9,999 रुपये आहे. IDFC FIRST डेबिट कार्डद्वारे फोन केल्यास 750 रुपयांची सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरमुळे अतिरिक्त 5,600 रुपयांपर्यंतची बचत करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.