Maharashtra Bendur 2024 : राज्यभर बेंदूर सण उत्साहात साजरा; विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या

Bendur Festival Information in Marathi : महाराष्ट्रात काही गावांमध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा कोला जातो. कर्नाटकात सुद्धा बेंदूर हा सण साजरा केला जातो. राज्यात सांगली, सोलापूर
Bendur Festival Information in Marathi
Maharashtra Bendur 2024Saam TV
Published On

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात विविध सण उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. कृषिप्रधान देश असल्याने अनेक व्यक्तींचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. शेतकरी शेतात आपला घाम गाळत काळ्या मातीत पिक फुलवतो. कष्टाने फुलवलेल्या या शेतीमध्ये विविध अवजारांसह बैलाचं देखील मोलाचं योगदान असतं. त्यामुळे काही ठिकाणी आज बेंदूर सण साजरा केला जात आहे.

Bendur Festival Information in Marathi
Nath Shashti Festival 2024: नाथनगरी दुमदुमली! पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास सुरवात; गोदातीरी भाविकांचा महापूर

महाराष्ट्रात काही गावांमध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा कोला जातो. कर्नाटकात सुद्धा बेंदूर हा सण साजरा केला जातो. राज्यात सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरच्या काही पट्यात या सणाला विशेष महत्व आहे. यामध्ये प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाप्रति मनात असलेल्या भावना व्यक्त करतो. बैल शेतकऱ्याला सर्वाधिक प्रिय असतो. शेतीच्या अनेक कष्टाच्या कामात त्याचा उपयोग होतो.

त्यामुळे बैलपोळा या सणाप्रमाणे प्रत्येक शेतकरी बेंदूर सुद्धा साजरा करतो. यामध्ये बैलाला विविध मोत्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. त्याला छान छान पदार्थ खाऊ घातले जातात. गावात बैलाला छान तयार करून त्याची मिरवणूक काढली जाते. तसेच त्याची पुजा देखील केली जाते. या दिवशी गावातील सर्व व्यक्ती आनंदी असतात. सर्वजण नवीन कपडे परिधान करून आनंदात हा सण साजरा करतात.

ज्या व्यक्तींच्या घरी बैल नसतो त्या व्यक्ती घरीच पिठापासून किंवा मग मातीपासून बैल बनवतात आणि बेंदूर साजरा करतात. आज बेंदूरनिमित्त अनेक गावांमध्ये बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारात विविध मिठाई, मातीची बैलजोडी, त्यांना सजवण्यासाठीचे सामान विकण्यासाठी बाजारात ठेवण्यात आले आहे.

आज या सणानिमित्त गावातील अनेक नागरिक सोशल मीडियावर देखील एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. तर काहींनी व्हॉट्सअॅप स्टेटस, स्टोरी शेअर करत देखील हा सण साजरा केला आहे. सध्या सोशल मीडियावर या सणाचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.

Bendur Festival Information in Marathi
Bhandardara Fireflies Festival 2024: काजव्यांची चमचम पाहण्यास भंडारद-याला येणार आहात? जाणून घ्या नियम व अटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com