देशातील बहुतांश बँका ग्राहकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा देतात. त्या बदल्यात, बँका ग्राहकांकडून भाडे आकारतात जे प्रत्येक बँकेनुसार बदलते. अनेकवेळा काही कारणाने बँक लॉकरमध्ये ठेवलेली मौल्यवान वस्तू गहाळ होते. असे झाल्यास ग्राहकांना किती नुकसान भरपाई मिळेल? याबाबत काय नियम आहेत ते जाणून घेऊया.
बँक लॉकरमधून चोरी झाल्यास किती भरपाई दिली जाते?
लॉकरचे योग्य कार्य आणि त्याच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी बँक (Bank) जबाबदार आहे. अशा स्थितीत बँकेच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या लॉकरचे काही नुकसान झाले तर त्याला बँक जबाबदार असेल आणि तुम्हाला योग्य ती भरपाई दिली जाईल.
त्याच वेळी, चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळल्यामुळे बँक लॉकरमधून तुमचे सामान गहाळ झाल्यास, नियमानुसार, बँक तुम्हाला लॉकरच्या (Locker) भाड्याच्या 100 पट रक्कम भरपाई म्हणून देईल. उदाहरणार्थ, जर तुमचे लॉकरचे भाडे 3,000 रुपये असेल, तर चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळल्यामुळे बँक लॉकरमधून वस्तू गहाळ झाल्यास, तुम्हाला 3,00,000 रुपये नुकसानभरपाई म्हणून दिले जातील.
एसबीआयच्या वेबसाइटवर (Website) दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या आवारात चोरी, दरोडा आणि इमारत कोसळण्याची कोणतीही घटना घडू नये याची खात्री करणे ही शाखेची जबाबदारी आहे. त्याचवेळी, वर नमूद केलेल्या कारणांमुळे किंवा कर्मचाऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे बँकेच्या आवारात असलेल्या लॉकरमधून वस्तू गहाळ झाल्यास, बँक ग्राहकाला लॉकरच्या भाड्याच्या 100 पट रक्कम भरपाई देईल.
लॉकर अधिक वेळ बंद असल्यास काय होते?
जर एखादा ग्राहक लॉकर भाड्याने घेतोय आणि तो लॉकरचे भाडे वेळेवर भरतोय. परंतु सात वर्षांपेक्षा जास्त काळ लॉकर उघडला नसेल, अशा स्थितीत बँक लॉकर निष्क्रिय (डीअॅक्टीव्हेट) मानले जाते. त्यानंतर नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला बोलावून लॉकरमधील वस्तू त्याच्याकडे सोपवल्या जातात
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.