Bank News: पैसे काढण्यासाठी चेक भरताय? या चुका टाळा. अन्यथा...

Chequebook Rule : जर तुम्हीही चेकचा वापर करुन व्यव्हार करत असाल तर सावधगिरी बाळगा.
Chequebook Rule
Chequebook RuleSaam Tv
Published On

Chequebook Payment Rules

आजकाल संपूर्ण जग डिजिटल होताना दिसत आहे. बँकाची सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. परंतु आजही अनेक लोक चेक वापरुन बँकेतून पैसे काढतात. चेकचा वापर करुन पैसे काढणे हे सुरक्षित असते. लोक मोठी रक्कम काढण्यासाठी चेक वापरण्यास प्राधान्य देतात.

चेक वापरुन मोठी रक्कम काढणे हे जास्त सोयीस्कर असते. अनेक बँका खाते उघडताना ग्राहकाला पासबुक, एटीएम कार्डसोबत चेकबुकही देतात. जर तुम्हीही चेकचा वापर करुन व्यव्हार करत असाल तर सावधगिरी बाळगा. अन्यथा लहान चुका महागात पडतील.

चेक देताना नेहमी सावधगिरी बाळगा. अंक योग्य लिहा. ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे असेल तर त्याचे नाव चेकमध्ये लिहावे. चेकवर सही करणे आवश्यक असते. यामध्ये कोणत्याही प्रकारची चुक करु नका. चेकवर सही करताना या चुका नेहमी टाळा.

Chequebook Rule
Heart Disease Increasing In Youngster : तरुणांमध्ये वाढताय हृदयाच्या समस्या, कशी घ्याल काळजी?

1. पेनचा वापर करा

चेकमध्ये खाडाखोड होऊ नये म्हणून फक्त पेनचा वापर करा. जेणेकरुन चेक व्यवस्थित भरला जाईल. याच्या मदतीने तुम्ही फसवणूकही टाळू शकता.

2. चेकवर सही करुन कोणालाही देऊ नका

कोरा चेक भरुन कोणालाही देऊ नका. कारण त्यात कोणतीही रक्कम भरता येते. हे खूप धोकादायक आहे.

3. खात्यात शिल्लक रक्कम असणे आवश्यक

चेक बाऊन्स झाल्यावर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. कदाचित तुरूंगातही जावे लागेल. जेव्हा बँकेकडून काही कारणांनी चेक स्विकारला जात नाही आणि पैसे दिले जात नाही. त्याला बाऊन्स चेक म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे खात्यात रक्कम शिल्लक नसणे. त्यामुळे खात्यात शिल्लक रक्कम ठेवणे फार महत्त्वाचे आहे.

Chequebook Rule
Dahi Handi 2023 : गोविंदा रे गोपाळा..., जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीचं दहीहंडी का साजरी केली जाते?

4. चेक नंबर ठेवा

चेक नंबर लिहून ठेवा. तो तुमच्या रेकॉर्डमध्ये ठेवा. हा नंबर तुम्ही शंका दूर करण्यासाठी किंवा व्हेरिफिकेशनसाठी बँकेला देऊ शकता.

5. कोऱ्या चेकवर सही करु नका

कधीच कोऱ्या चेकवर सही करु नका. चेकवर सही करण्यापूर्वी चेक ज्या व्यक्तीला देणार आहात त्याचे नाव, रक्कम, तारीख लिहा.

6. सही करताना कोणतीही चुक नसावी

चेक भरताना नेहमी योग्य सही करावी. अन्यथा चेक बाऊन्स हेईल. तुमची सही आणि चेकवरची सही जुळली नाही तर बँका पैसे देत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com