Bajra Recipes : हिवाळ्यात खा स्वादिष्ट बाजरीचे पदार्थ, वाढेल रोगप्रतिकारशक्ती आणि राहाल निरोगी

Bajra Recipes For Winter Season : हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते, कारण या ऋतूत ती आपल्या शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते. बाजरीपासून बनवलेले पदार्थ चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात.
Bajra Recipes
Bajra RecipesSaam Tv
Published On

Winter Season Care :

हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते, कारण या ऋतूत ती आपल्या शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते. बाजरीपासून बनवलेले पदार्थ चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर (Benefits) असतात.

बाजरीमध्ये आरोग्यासाठी उपयोगी ठरतील असे मॅग्नेशियम, फायबर, लोह, कॅल्शियम आणि नायट्रोजन मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात. वजन कमी करण्यासाठी बाजरी खूप उपयुक्त मानली जाते. तसेच रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बाजरी खूप उपयुक्त आहे. याशिवाय बाजरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. चला बाजरीपासून बनवलेल्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया.

Bajra Recipes
Biscuit Cake Recipe : सोपा आणि झटपट बनणारा बिस्किट केक, मुलेही खातील आवडीने; पाहा रेसिपी

बाजरीचे लाडू

हिवाळ्यात बाजरीचे लाडू बनवू शकता. तुम्ही त्यात ड्रायफ्रुट्स (Dryfruits) मिसळू शकता. भाजलेल्या बाजरीत सुका मेवा, देशी तूप आणि साखर मिसळून लाडू बनवता येतात.

बाजरीची भाकरी

तांंदळाच्या भाकरीप्रमाणे बाजरीचे पीठ कोमट पाण्याने मळून घेतले जाते. त्या पिठाची भाकरी बनवून घ्या. आता ही भाकरी लसूण आणि हिरव्या मिरचीच्या चटणीबरोबर किंवा देशी तूपासोबत खाऊ शकता.

Bajra Recipes
Soup Recipe: चवदार अन् झणझणीत गावरान मटण सूपची सोप्पी रेसिपी

बाजरी आणि मेथी कचोरी

बाजरीच्या पिठात हलके मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा आणि नंतर मेथीची हिरवी भाजी पाण्याने चांगली धुवून बारीक करा, आता पिठ मळताना मिक्स करा, नंतर त्यापासून चपटी कचोरीचा आकार द्या, नंतर गरम तेलात तळा. कचोऱ्या तयार आहेत ज्या तुम्ही आलू कोबी किंवा दम आलू सोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com