महिलांमध्ये होते या कारणांमुळे Back Painची समस्या, कसे कराल दूर

Problem In Women : काही कारणे काही आजारांशी देखील संबंधित आहेत जी प्रामुख्याने महिलांमध्ये होतात, तर काही वेळा पाठदुखीचे कारण वय आणि लिंग असू शकते. आज या लेखात आम्ही तुम्हाला 40 व्या वर्षी महिलांना पाठदुखीच्या समस्येचा सामना का करावा लागतो हे सांगणार आहोत.
Back Pain Problem In Women
Back Pain Problem In WomenSaam Tv
Published On

Back Pain Problem :

तुम्ही देखील तुमच्या 40शीत आहात आणि सतत पाठदुखीने तुमचे जीवन कठीण केले आहे? बहुतेक महिलांना वयाच्या 40 व्या वर्षी पाठदुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामागे अनेक कारणे असू शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही कारणे काही आजारांशी देखील संबंधित आहेत जी प्रामुख्याने महिलांमध्ये होतात, तर काही वेळा पाठदुखीचे कारण वय आणि लिंग असू शकते. आज या लेखात आम्ही तुम्हाला 40 व्या वर्षी महिलांना (Women) पाठदुखीच्या समस्येचा सामना का करावा लागतो आणि तो कसा बरा होऊ शकतो हे सांगणार आहोत.

महिलांना पाठदुखीच्या समस्येचा सामना का करावा लागतो?

पुरुषांपेक्षा स्त्रियांना पाठीच्या समस्यांना अधिक सामोरे जावे लागते. त्यामागील कारणे अशी आहेत -

  • प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS)

  • प्रीमेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (PMDD)

  • एंडोमेट्रिओसिस

  • डिसमेनोरिया

  • उशीरा गर्भधारणा

  • ऑस्टियोपोरोसिस

  • लठ्ठपणा

  • मेनोपॉज (Menopause)

  • खराब जीवनशैली

Back Pain Problem In Women
Yoga Tips For Back Pain : बसताना किंवा वाकताना पाठदुखी होत असेल तर ही 3 योगासने ठरतील बेस्ट, आठवड्याभरात मिळेल आराम

पाठदुखीची इतर कारणे पाठदुखीची इतर

अनेक कारणे आहेत जी कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतात. त्यांच्याबद्दलही जाणून घेऊया -

  • स्नायूंचा ताण

  • सायटिका

  • हर्निएटेड डिस्क

  • डीजनरेटिव्ह डिस्क

वयाच्या 40 व्या वर्षी महिलांना पाठदुखीच्या समस्येपासून आराम कसा मिळतो?

जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर काही उपायांचा अवलंब करून तुम्ही यापासून आराम मिळवू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया -

रोजचा व्यायाम -

पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एरोबिक ट्रेनिंग, स्ट्रेंथ एक्सरसाइज, लवचिकता संतुलन यांसारखे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. एका संशोधनानुसार, ज्या महिला आठवड्यातून किमान 3 ते 5 वेळा व्यायाम करतात त्यांना पाठीच्या समस्यांचा धोका कमी असतो.

Back Pain Problem In Women
Yoga Tips For Neck And Back Pain : वारंवार होतोय मान आणि पाठदुखी त्रास? ही चार योगासने ठरतील बेस्ट

गरम पाण्याने अंघोळ करा -

आंघोळ करताना गरम पाण्याचा वापर केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंचा त्रास आणि घट्टपणाही कमी होतो.

वजन कमी करा -

जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाढत्या वजनामुळे पाठदुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा.

Back Pain Problem In Women
Back Pain Problem : वाढत्या वयात सतावतेय पाठदुखी ? दुर्लक्ष केल्यास येऊ शकते अंपगत्व, कशी घ्याल काळजी

पोश्चरची काळजी घ्या -

उठताना किंवा बसताना तुमच्या पोश्चरची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः तुम्ही काम करत असाल आणि तासन् तास खुर्चीवर बसून काम करत असाल तर याची जास्त काळजी घ्या.

आईस पॅक -

आईस पॅकच्या मदतीने तुम्ही पाठदुखी, मोच आणि सूज कमी करू शकता. याचा वापर केल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com