Avoid Using Phone In Toilet: टॉयलेटमध्ये फोन वापरणं म्हणजे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या सविस्तर

Clean Your Phone: टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरण्यामुळे जंतू आणि संसर्ग वाढू शकतो. फोनवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. त्यामुळे फोनची नियमित स्वच्छता करणे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
A person using a smartphone while sitting in the toilet, unaware of the germs accumulating on the device
A person using a smartphone while sitting in the toilet, unaware of the germs accumulating on the device
Published On
Summary
  • टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरल्यामुळे जंतू साचण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

  • फोनवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात, जे संसर्ग निर्माण करू शकतात.

  • आठवड्यातून एकदा तरी फोनची योग्य पद्धतीने स्वच्छता करणे आवश्यक आहे.

  • चुकीची क्लिनिंग प्रॉडक्ट वापरल्याने फोनच्या सीलिंग व स्क्रीनला नुकसान होऊ शकते.

सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण तो स्वयंपाकघरात असो, जेवणाच्या टेबलावर असो किंवा अगदी शौचालयात असो, सतत हाताळत असतो. परिणामी, फोनवर विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि विषाणू साचण्याची शक्यता प्रचंड वाढते. विशेष म्हणजे आपण दिवसभरात सर्वाधिक वेळा हातात घेत असलेला हा फोन मात्र स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिकच वाढतो.

अभ्यासातून असे समोर आले आहे की, फोनवर टॉयलेट सीटपेक्षा अधिक बॅक्टेरिया आढळतात. त्यामुळे फोनची स्वच्छता करणे ही आता केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाब बनली आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी फोनची योग्य प्रकारे स्वच्छता करणे गरजेचे आहे. विशेषतः फोन रुग्णालय, सार्वजनिक वाहतूक, जिमसारख्या ठिकाणी नेल्यास, स्वच्छतेच्या वेळा अधिक वाढवाव्या लागतील. कारण अशा ठिकाणी फोनवर सुमारे २२०० पेक्षा अधिक सूक्ष्मजीव सापडण्याची शक्यता असते.

A person using a smartphone while sitting in the toilet, unaware of the germs accumulating on the device
Spam Calls: वारंवार येणाऱ्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड कॉल्समुळे वैतागलात ? मग 'हे' अॅप आताच डाउनलोड करा

परंतु, फोन स्वच्छ करताना योग्य उत्पादनांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीचे केमिकल क्लिनर वापरल्यास फोनच्या वॉटरप्रूफ सीलिंग, टच सेन्सिटिव्हिटी आणि स्क्रीनवरील सुरक्षात्मक कोटिंग यांचे नुकसान होऊ शकते. ब्लीच, हायड्रोजन पेरॉक्साईड, व्हिनेगर, एअरोसोल स्प्रे किंवा विंडो क्लीनर यांचा वापर टाळावा, असे तज्ञ सुचवतात.

A person using a smartphone while sitting in the toilet, unaware of the germs accumulating on the device
Mahindra-Maruti Cars: स्वस्त किंमतीत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार, महिंद्रा आणि मारुतीची बाजारात होणार धमाकेदार एंट्री

नेमके कसा फोन स्वच्छ कराल?

फोन स्वच्छ करताना सर्वप्रथम तो चार्जर व कव्हरपासून वेगळा करावा. चार्जिंग पोर्ट, स्पीकर ग्रिलसारख्या नाजूक भागांची सफाई करण्यासाठी अँटी-स्टॅटिक ब्रशचा वापर करावा. थेट फोनवर कोणतेही द्रव फवारू नये. टिश्यू पेपर किंवा खरडणारे कपडे वापरणे टाळावे. ७० टक्के आयसोप्रोपिल अल्कोहोलयुक्त वाइप्स आणि मायक्रो फायबर कापडाचा वापर हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.

A person using a smartphone while sitting in the toilet, unaware of the germs accumulating on the device
iPhone युजर्ससाठी धक्का! Truecaller मधील कॉल रेकॉर्डिंग फीचर होणार बंद, बॅकअपसाठी 'असा' उपाय करा

खाण्यापूर्वी जसे आपण हात धुणे आवश्यक समजतो, तसाच आपल्या मोबाईल फोनची देखील नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. अन्यथा, आपल्या नकळत फोनवरून संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी मोबाईल फोन स्वच्छ ठेवण्याची सवय अंगीकारणं आवश्यक आहे.

Q

टॉयलेटमध्ये फोन वापरणे आरोग्यासाठी किती घातक आहे?

A

टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने फोनवर बॅक्टेरिया, विषाणू साचतात. हे जंतू हातांद्वारे शरीरात जाऊन संसर्ग निर्माण करू शकतात.

Q

फोनवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात का?

A

होय, संशोधनानुसार फोनवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया आणि विषाणू आढळतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

Q

फोन किती वेळा स्वच्छ करावा?

A

सामान्य परिस्थितीत आठवड्यातून एकदा आणि सार्वजनिक ठिकाणी नेल्यास दररोज फोनची स्वच्छता करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com