देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. यासोबतच मोठ्या संख्येने लोक भारतात येतात किंवा देशात अनेकजण नातेवाईकांकडे तसेच येथे भेट देण्यासाठी फ्लाइट्सचा वापर करतात. अशा सणासुदीचा हंगामात तेल मार्केटिंग (Marketing) कंपन्यांनी (OMC) मोठा धक्का देत विमानाचे इंधन महाग केले आहे. यानंतर राजधानी दिल्लीत ATF ची किंमत 1,18,199.17 रुपये प्रति किलो लिटरवर पोहोचली आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत येथे 5500 किलो लिटर म्हणजेच 5.50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. याच्या नवीन किमती आज 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ATFच्या किमतीत वाढ झाली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये, दिल्लीमध्ये ATF ची किंमत प्रति लिटर 1.12 लाख रुपये विकली जात होती.
मेट्रो शहरांमध्ये एटीएफची किंमत जाणून घ्या -
दिल्ली - 1,18,199.17 रुपये प्रति किलोलिटर
कोलकाता- 1,26,697.08 रुपये प्रति किलोलिटर
मुंबई (Mumbai) - 1,10,592.31 रुपये प्रति किलोलिटर
चेन्नई- 1,22,423.92 रुपये प्रति किलोलिटर
1 सप्टेंबरलाही भाव वाढले होते
1 सप्टेंबर रोजी एटीएफच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली होती, त्यानंतर सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी एअरलाइन्स कंपन्यांची चिंता वाढली होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑक्टोबर महिन्यात हवाई इंधनाच्या (Fuel) किमतीत झालेल्या वाढीसह हवाई इंधनाच्या किमतीत सलग चार वेळा वाढ करण्यात आली आहे.
1 जुलै रोजीही तेल कंपन्यांनी एटीएफच्या किमतीत 1.65 टक्क्यांनी वाढ केली होती. जेट इंधनाच्या किमती वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून त्याची किंमत $97 वर पोहोचली आहे. अशा स्थितीत जुलैपासून आत्तापर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली असून केवळ सप्टेंबर महिन्यातच 15 टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली आहे.
सणासुदीत खिसे खाली होतील
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून काही दिवसांतच सणासुदीला सुरुवात होणार आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी, छठ या सणांच्या निमित्ताने लोक मोठ्या संख्येने आपापल्या घरी जातात. अशा स्थितीत हवाई इंधनाच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम विमान भाड्यावरही दिसून येईल. येत्या काही दिवसांत एअरलाइन्स कंपन्या त्यांच्या ग्राहकांवर हा बोजा टाकू शकतात आणि सणासुदीच्या काळात तुमच्यासाठी हवाई प्रवास महाग करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.