Blue Ant in Arunachal: अरुणाचल प्रदेशात सापडली निळ्या मुंगीची वेगळी प्रजाती

Blue Ant Species Discovered in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशात निळ्या मुंग्याची वेगळी प्रजाती सापडली आहे. नवीन प्रजाती पॅरापराट्रेचिना या दुर्मिळ वंशातील असल्याची माहिती मिळत आहे.
Blue Ant in Arunachal: अरुणाचल प्रदेशात सापडली निळ्या मुंगीची वेगळी प्रजाती
Blue AntSaam TV

मुंबई : जगात विविध प्रकारच्या आणि विविध रंगाच्या मुंग्या आढळतात. त्यामध्ये लाल, काळ्या, तपकिरी रंगाच्या मुंग्याच्या समावेश आहे. या मुंग्यांच्या आणखी एका प्रजातीचा शोध लागला आहे. ईशान्य भारताच्या अरुणाचल प्रदेशातील यिंकू गावात एक अनोखी 'निळी' रंगाची मुंगी सापडली आहे. ही नवीन प्रजाती पॅरापराट्रेचिना या दुर्मिळ वंशातील आहे. या प्रजातीला 'पॅरापराट्रेचिना ब्लू' असे नाव देण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, यिंकू गावात गुरांसाठी बांधण्यात आलेल्या पायवाटेच्या १० फूट उंचीवर असलेल्या झाडाच्या एका छिद्रात ही मुंगी आढळली. ZooKeys जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, शतकानुशतके जुन्या 'अभोर मोहिमे' नंतर जैवविविधतेचे पुनर्सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेदरम्यान अरुणाचल प्रदेशातील सियांग व्हॅलीमध्ये ही मुंगी सापडली. अभोर मोहीम ही भारतातील वसाहतवादी राजवटीच्या काळात (१९११ ते १९१२) स्थानिक लोकांविरुद्ध केलेली दंडात्मक लष्करी मोहीम होती.

Blue Ant in Arunachal: अरुणाचल प्रदेशात सापडली निळ्या मुंगीची वेगळी प्रजाती
Black Ant Pizza : काळ्या मुंगळ्यांचा पिझ्झा तुम्ही कधी खाल्लाय का? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

आता एका शतकानंतर, एटीआरईईच्या संशोधकांची टीम आणि फेलिस क्रिएशन्स बंगलोरच्या दस्तऐवजीकरण टीमने 'सियांग मोहीमे' च्या खाली जैवविविधतेचे पुनर्सर्वेक्षण आणि दस्तऐवजीकरण करणारी नवीन मालिका सुरू केली आहे. समृद्धता, सांस्कृतिक आणि पर्यावरण या समस्यांशी सामना करणारी सियांग व्हॅलीही विविधतेने नटली आहे. यामध्ये अजून अनेक शोध लागणे बाकी आहे.

निळी पॅरापराट्रेचिना ही एक लहान मुंगी असून तिची लांबी दोन मिमीपेक्षा कमी आहे. अँटेना, जबडा आणि पाय वगळता तिचे शरीर मुख्यतः निळ्या रंगाचे आहे. तिचे डोके मोठ्या डोळ्यांसोबत त्रिकोणी दिसतात. तिला पाच दात असलेला त्रिकोणी मुखभाग देखील आहे.

या संशोधनात असे म्हटले आहे की, या लष्करी मोहिमेमधील एका वैज्ञानिक पथकाने सियांग व्हॅलीचा नैसर्गिक इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास करून त्यांनी दस्तऐवजीकरण केले. प्रतिकूल भूभाग, हवामान आणि स्थानिक जमातींचा प्रतिकार यासह अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. सियांग व्हॅली प्रदेशाच्या मोठ्या भागाचा शोध लावण्यास आणि त्यांचा नकाशा तयार करण्यास ही मोहिम यशस्वी झाली.

१९१२ ते १९२२ पर्यंतच्या भारतीय संग्रहालयाच्या दस्तऐवजांमध्ये अनेक भागांचे शोध लागले आहे. त्यांनी प्रत्येक वनस्पती, बेडूक, सरडे, मासे, पक्षी आणि सस्तन प्राणी आणि कीटकांची देखील यात यादी केली. याबाबत संशोधकाने सांगितले की, धरणे, महामार्ग आणि लष्कर यांसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये बदलत्या हवामानासारखे झपाट्याने बदल घडवून येत आहे. याचा प्रभाव दरीच्या पलीकडे पसरलेला आहे.

Blue Ant in Arunachal: अरुणाचल प्रदेशात सापडली निळ्या मुंगीची वेगळी प्रजाती
Ant Chatni: 'या' गावांमध्ये चक्क लाल मुंग्यांची चटणी खातात

प्राण्यांच्या जातींमध्ये निळा रंग दुर्मिळ आढळतो. फुलपाखरे, मधमाश्यायांसारख्या काही कीटकांमध्ये निळा रंग सामान्यतः दिसून येतो. परंतु मुंग्यांमध्ये निळा रंग तुलनेने दुर्मिळ आहे. जगभरातील १६,७२४ मुग्यांच्या जाती, प्रजातीपैंकी काही निळ्या किंवा इंद्रधनुषी रंगांच्या मुंग्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com