महिलांना विविध पद्धतीचे ड्रेस परिधान करणे आवते. कधी जिन्स शर्ट तर कधी स्कर्ट, साडी असे विविध कपडे ते परिधान करतात. महिलांच्या कपड्यांमध्ये वेगवेगळी आणि अतरंगी फॅशन सुद्धा असते. यात पूर्ण स्लिव्स, हाफ स्लिव्स आणि स्लिवलेस ड्रेस सुद्धा असतात. अशात काही महिला स्लिवलेस ड्रेस परिधान करत नाहीत. हात जास्त जाड वाटतात त्यामुळे त्यांना असे कपडे परिधान करताना लाज वाटते.
महिलांच्या दंडावर काहीवेळा जास्त जरबी असते. अशा दंडांना फ्लॅबी आर्म्स असं सुद्धा म्हणतात. दंड असे जाड असल्यास किंवा तेथे चरबी जास्त असल्यास महिला असे कपडे घालणे टाळतात. त्यामुळेच आज जाड दंड बारीक कसे करायचे याची माहिती जाणून घेणार आहोत.
दंड बारीक करण्यासाठी सर्वात सोपी एक्सरसाइज म्हणजे पुशअप्स आहेत. पुशअप्स करताना तुम्हाला शरीराचा पूर्ण भार दंडांवर घ्यायचा असतो. त्यामुळे या सिंपल एक्सरसाइजने तुमचे दंड बारीक होण्यास मदत होईल. तुम्ही घरच्याघरी रोज ५ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली तरी देखील दंड बारीक होतात.
ट्रायसेप डिप्स ही अतिशय भन्नाट एक्सरसाईज आहे. याने पुशअप्स पेक्षाही जास्त लवकर दंड बारीक होतात. त्यासाठी तुम्हाला एका बेटच्या कडांवर किंवा खुर्चीवर बसावे लागेल. त्यानंतर दोन्ही पाय पुढे करून खुर्ची किंवा बेडवर हात ठेवत हळू हळू कमरेतून शरीर खाली घ्या. अशा पद्धतीने तुम्ही ट्रायसेप डिप्स मारू शकता.
सिंगल आर्म प्लँक करणं थोडं कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला आधी पुशअप्स करता येणं गरजेचं आहे. कारण यामध्ये पुशअप्सच्या पोजमध्ये फक्त एका हाताने सिंगल आर्म प्लँक करायचं आहे. त्यामुळे या एक्सरसाइजने सुद्धा तुमच्या दंडावर असलेली जास्तीची चरबी लगेचच कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.