Health Tips : तुम्हाला देखील ऑनलाइन फूड ऑर्डर करण्याची सवय आहे ? जडू शकतात 'हे' गंभीर आजार

तुम्हाला माहीत आहे का ? बाहेरच्या खाण्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Health Tips
Health TipsSaam Tv
Published On

Health Tips : हल्ली झोमॅटो, स्विगी सारख्या फूड साईट्सने लोकांना पार वेड लावून ठेवले आहे. ऑनलाईनचे वेड सध्या सगळीकडे पाहायला मिळते. या साइट्स आपल्याला वेळोवेळी ऑफर देत असतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का ? बाहेरच्या खाण्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

अनेकांना घरापेक्षा बाहेरचे खाणे चांगले वाटते. कारण, ते खूप चवदार असते. पण हल्ली ऑनलाइनच्या युगात लोकांना घरी बसूनच बाहेरचे खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करण्याची सवय जडली आहे. पण सतत बाहेरच्या खाण्यामुळे आपल्याला अनेक आजार जडू शकतात.

Health Tips
Health Tips : इतरांपेक्षा तुम्हाला अधिक थंडी वाजते का? असू शकते शरीरात 'या' गोष्टींची कमतरता

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अंकित यांच्या मते, बाहेरील पदर्थामध्ये चीज, लोणी यांसारख्या आहारात चरबीचे प्रमाण जास्त असते. जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि शरीरात ब्लॉकेज, फॅट, टॉक्सिन्स निर्माण करते. या सर्व समस्यांमुळे 6 धोकादायक आजार शरीराला घेरतात.

आहारातील डाइटरी फॅट तोटे काय आहेत?

डॉ.अंकित यांच्या मते,डाइटरी फॅट मध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, जे कोलेस्ट्रॉल, शरीरातील चरबी आणि विषारी पदार्थ तयार करतात. अशा फॅट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास लठ्ठपणा, हृदयरोग आणि काही प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.

बाहेरील अन्न पदार्थामुळे लठ्ठपणा जास्त वाढतो

आहारातील डाइटरी फॅट प्रथम शरीरावर अतिरिक्त चरबी टाकते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. जर तुम्हीही बाहेरचे अन्न खाऊन जाड झाला असाल तर तुम्ही आयुर्वेद डॉक्टर अंकित यांच्या काही टिप्स अवलंबू शकता.

•संतुलित आणि नियंत्रित कॅलरी आहार घ्या.

•एका आठवड्यात 150 ते 300 मिनिटे शारीरिक हालचाली करा जसे की वेगवान चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा टेनिस.

•जास्त खाणे टाळा आणि हळूहळू खा.

Health Tips
Health Tipssaam Tv

बाहेरील अन्न पदार्थ देतात या 6 आजारांना आमंत्रण

मधुमेह

•फॅटी लिवर

हृदयविकाराचा झटका

•वजन वाढणे आणि लठ्ठपणा

•तणाव

हाय ब्लड प्रेशर

हे 6 आजार गंभीर झाल्यास किंवा आहार आणि व्यायामाने त्याचे व्यवस्थापन होत नसेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com