Glass For Windows : टींटेड ग्लास तुम्ही पहिलेच असतील त्यामधून सूर्यप्रकाश जास्ती जात नाही काही प्रमाणात जातो. हिवाळ्यात घराचे तापमान वाढवण्यासाठी लोक अशा काचेचा वापर त्यांच्या घरात करतात.
उन्हाळ्यामध्ये तापमान व्यवस्थित राहते. हवामानाचा (Weather) जास्ती प्रभाव नसावा म्हणून या ग्लासला जास्ती मागणी आहे. काहीवेळेस प्रकाशाची आवश्यकता असते, तर कधी कमी प्रकाशाची आवश्यकता असते.
अशा वेळेस सामान्य टींटेड ग्लास (Glass) कमी येत नाहीत. अशा वेळेस बाजारात उत्कृष्ट टींटेड ग्लास उपलब्ध आहेत ज्याने तुम्ही बटनाच्या साह्याने नियंत्रण ठेवू शकता.चला तर मग त्याविषयी माहिती जाणून घेऊया.
इलेक्ट्रिक टींटेड ग्लासची वाढती संकल्पना -
हे इलेक्ट्रिक टींटेड ग्लास बाजारात सहज तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्ही स्विचच्या साह्याने काम करणारे टींटेड ग्लास बद्दल ऐकलेच असेल त्याची किंमत सामान्य टींटेड ग्लास पेक्षा जरा जास्त आहे.
परंतु तुम्ही जर का एकदा हे घरांच्या खिडकीला लावलं तर याचे पूर्ण नियंत्रण तुमच्या हातात असते तुम्ही स्वतः ठरवू शकतात तुम्हाला घरात जास्त सूर्यप्रकाश पाहिजे जर तुम्हाला घरात कमी सूर्यप्रकाश पाहिजे असेल तर तुम्ही स्विच च्या साह्याने सहज करू शकता.
नुसतं एक बटन दाबून ते तुम्ही चालू किंवा बंद करू शकता. स्वीच चालू केल्याने पारदर्शक दिसते आणि स्विच बंद केल्याने टींटेड काचेसारखे दिसते.
कोणत्या कामासाठी जास्त वापर केला जातो -
याचा वापर ऑफिस आणि दुकानासारख्या ठिकाणी केला जातो. बरेच लोक याचा वापर करतात. त्याने ऑफिस किंवा दुकान छान दिसते तसेच गोपनीयता सुद्धा राखली जाते. तसेच बरेच लोक त्याचा वापर घरातील तापमान नियंत्रणासाठी करत आहेत. तुम्ही हे Amazon वरून देखील खरेदी करू शकता. Amazon वर त्याची किंमत 4000 पासून सुरू होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.