WhatsApp : WhatsApp चे आणखी एक नवे बहुप्रतीक्षित फीचर; लवकरच घेऊ शकणार आनंद

WhatsApp ने एक नवीन फीचर लाँच केले आहे.
WhatsApp
WhatsAppSaam Tv

WhatsApp ने एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने Google Meets आणि Microsoft Teams सारख्या अॅप्सला WhatsApp टक्कर देऊ शकेल. WhatsApp चे फीचर सर्वांपेक्षा खूपच वेगळे आहे. अॅक्टिव्ह यूजर्सच्या बाबतीत, इतर प्लॅटफॉर्म अॅपच्या आसपासही पोहोचलेले नाहीत. WhatsApp नेहमीच आपल्या यूजर्सला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रयत्नशील असतं. सोमवारी नव्या फीचरसंबंधित घोषणा केली आहे. त्याची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून यूजर्सला होती. त्या नवीन फीचरचे नाव कॉल लिंक्स असे आहे.

नक्की नव्या फिचरमध्ये काय आहे?

या फीचरमुळे WhatsApp यूजर्स कोणत्याही सुरू असलेल्या कॉलवर अॅड होऊ शकता; अथवा पुन्हा नवा कॉल (Call) सुरू करू शकता. Call Link हे फीचर अॅपच्या कॉलिंग सेक्शनमध्ये सापडेल. यूजर्स ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल दोन्हींसाठी लिंक तयार करत शेअर करू शकणार आहेत. Meta च्या मते, यूजर्सलाही ही सेवा या आठवड्याच्या शेवटी मिळेल. यासाठी यूजर्सने नवीन व्हर्जन डाऊनलोड केलेले हवे. सोबतच WhatsAppने ग्रुप व्हिडिओ कॉलचीही माहिती दिली आहे.

WhatsApp
Chinese Temple : अरेच्चा ! प्रसादात ठेवतात नूडल्स, चायनीज लोक करतात 'या' देवीची पूजा

आणखी एक नवे फिचरही यूजर्सला मिळणार -

लवकरच यूजर्सना व्हिडिओ कॉलवर ३२ जणांना अॅड करू शकता येणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. मार्क झुकरबर्ग यांनी सोशल मीडियावर (Media) पोस्ट शेअर करत WhatsApp वर कॉल लिंकवर फीचर येणार आहे, असे सांगितले. या मदतीने यूजर्स आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना लिंक शेअर करू शकता. त्या लिंकवर क्लिक करत कॉलवर अॅड होऊ शकता. यापूर्वी Google Meet किंवा Microsoft Teams वर यूजर्स असे वापर करायचे.

WhatsApp
Weight Loss Tips : आता वाढलेल्या वजनाची चिंता नकोच ! झोपण्यापूर्वी करा 'हे' काम

नवे फिचर कसे वापराल?

Meta ने अद्याप हे फीचर Android, iOS किंवा Windows कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करेल हे सांगितले नाही. कोणालाही कॉल करण्यापूर्वी यूजर्सना Call टॅबमध्ये Create Call Link पर्यायावर क्लिक करत, यूजर्सला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीही कॉल करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com