Anger Effect On Body : आपल्याला राग का येतो ? तो आल्यानंतर शरीर थरथरु का लागते ?

आजच्या जीवनशैलीचा मनावर परिणाम होत आहे.
Anger Effect On Body
Anger Effect On Body Saam Tv
Published On

Anger Effect On Body : राग आल्यानंतर बरेचदा आपण स्वत:ला नुकसान पोहचवण्याचे काम करतो. आपल्या कामाच्या ताणामुळे किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे आपला राग अनियंत्रित होतो. बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम दिसून येतो. यामुळे तरुणांच्या शरीरात अनेक बदल होत आहे. चिंता, नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा हे जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत.

आजच्या जीवनशैलीचाही (Lifestyle) मनावर परिणाम होत आहे. त्यामुळे लोक मानसिक समस्यांशी झुंजत आहेत. यामुळेच लोकांमध्ये रागाचे प्रमाण वाढत आहे. राग येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही लोक इतके आक्रमक होतात की त्यांचे हात, पाय, अगदी चेहऱ्यासह संपूर्ण शरीर थरथर कापू लागते. रागाचा कंपनाशी काय संबंध आहे याचा कधी विचार केला आहे का? याबद्दल जाणून घेऊया.

Anger Effect On Body
Health Tips : तुमची नखं पिवळी दिसताय का? तुम्हाला सतत घाम येतो का ? असू शकतात या आजाराचे संकते

1. शरीर थरथर का कापू लागते?

एखाद्या व्यक्तीला राग आल्यानंतर सहसा त्याचे शरीर थरथरु लागते. कदाचित तुम्ही स्वतःही या समस्येने त्रस्त असाल. खरं तर, त्यामागे काही भावना आणि वैद्यकीय कनेक्शन आहे. डॉक्टर सांगतात की, जे लोक भावनिक स्वभावाचे असतात. ते खूप विचार करतात किंवा अगदी लहान गोष्टीही त्यांच्या मनात ठेवतात. अशा लोकांच्या मेंदूमध्ये स्ट्रेस हार्मोनची निर्मिती सामान्य पातळीपेक्षा जास्त होऊ लागते. या हार्मोनमुळे रक्तदाब वाढतो. हार्मोन्सच्या अतिरेकामुळे शरीरासह मनाचे संतुलन बिघडू लागते. या कारणामुळे व्यक्तीमध्ये कंपन सुरू होते. जसजसा ताण कमी होतो तसतसे हार्मोन्स कमी होतात. मेंदू शरीरावर नियंत्रण ठेवू लागतो आणि व्यक्ती थरथरु लागते.

2. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त रागावतात का ?

अनेक संशोधनात असे समोर आले आहे की पुरुष महिलांपेक्षा (Women) जास्त रागावतात. जेव्हा राग येतो तेव्हा बॉडी अॅड्रेनालाईन नावाचे विषारी विष बाहेर फेकते आणि हे संपूर्ण शरीरात पसरते. यामुळे अनेक आजार होतात. पुरुष सहसा राग व्यक्त करत नाहीत. त्यामुळे त्रास आणखीनच वाढतो. लोकांनी रागावणे टाळावे. जे लोक जास्त वेळ रागावतात त्यांना हृदयविकाराचा धोका इतर लोकांपेक्षा जास्त असतो.

त्रास टाळण्यासाठी काय करावे

  • स्ट्रेस हार्मोन्स कमी स्रावित होतात. यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.

  • यामध्ये तुम्ही रोज योगा करू शकता. योगामध्ये अनुलोम विलोम, प्राणायाम, कपाल भाटी आणि इतर योगाचा समावेश होतो.

  • जर तुम्हाला योगा माहित नसेल तर योगगुरूच्या संपर्कात येऊन योगा करायला शिका.

  • यामुळे स्ट्रेस हार्मोनची पातळी नियंत्रित राहते. योगासने केल्याने मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढते.

  • ताणतणाव संप्रेरके कमी होतात. जास्त राग येण्याची समस्या असल्यास दीर्घ श्वास घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • याशिवाय, मंद श्वास आत आणि बाहेर काढताना उलट संख्या 10 ते 1 पर्यंत मोजली पाहिजे. समस्या वाढत असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com