
Ajinomoto Side Effects : हल्ली लहानांपासून-मोठ्यांपर्यंत चायनीज पदार्थ खाणारे बरेच लोक आहेत. त्यांना अधिक चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचे वापर केला जातो. अजिनोमोटो, ज्याला मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) म्हणूनही ओळखले जाते. याचा बहुतांश वापर हा चायनीज पदार्थांमध्ये केला जातो.
तरुण पिढीला सध्या तरी चायनीज, मोमोजसारख्या अनेक पदार्थांचे व्यसन लागले आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अजिनोमोटो हे अनेक फास्ट फूड उत्पादने आणि पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये देखील आढळते. नियमितपणे जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने दुष्परिणाम होतात, ज्याला चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम असेही म्हणतात. (Latest Marathi News)
काही अभ्यासात असे दिसून आले आहे की हे सुरक्षित आहे, काही लोकांना याचे सेवन केल्यानंतर अस्वस्थता जाणवते. यामध्ये सामान्यत: जळजळ, श्वासोच्छवासाच्या समस्या, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि हृदय गती वाढणे यांसारखे आजार पाहायला मिळतात. चला तर जाणून घेऊया, अजिनोमोटोचे शरीरावर दुष्परिणाम कसा होतो. (Side Effects Of Ajinomoto)
1. वंध्यत्व
अतिप्रमाणात चायनीज पदार्थांचे सेवन करणाऱ्या महिलांचा संबंध वंध्यत्वाशी जोडला गेला आहे. तसेच गर्भवती महिलांमध्ये, ते बाळाला (Baby) अन्न पुरवठ्यातील प्लेसेंटल अडथळे मोडून टाकू शकते आणि मेंदूच्या न्यूरॉन्सवर देखील विपरित परिणाम करू शकते. आहारात सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने गर्भधारणेदरम्यान पाणी टिकून राहणे आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो.
2. मायग्रेन
अजिनोमोटोचे सेवन केल्याने डोकेदुखीचा (Headache) त्रास उद्भवू शकतो. याचे नियमित सेवन केल्याने किरकोळ डोकेदुखी होऊ शकते जी गंभीर मायग्रेनमध्ये स्नोबॉल होऊ शकते.
3. छातीत दुखणे
अजिनोमोटो असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने हृदयाचे ठोके अचानक कमी होतात किंवा वाढतात, हृदयाचे ठोके असामान्य होणे, छातीत दुखणे आणि ह्रदयाचे स्नायू बंद होणे असे अनेक आजार दिसून येतात.
4. लठ्ठपणा
नियमितपणे अजिनोमोटोचे सेवन केल्याने वजन वाढू शकते किंवा लठ्ठपणा येऊ शकतो. आपल्या शरीरातील लेप्टिन हार्मोन मेंदूला खाणे थांबवण्याचे संकेत देतो. यामुळे अजिनोमोटोचे जास्त सेवन केल्याने लेप्टिनचा प्रतिकार होऊ शकतो, ज्यामुळे व्यक्ती जास्त खातो आणि लठ्ठ होतो.
5. उच्च रक्तदाब
टेबल सॉल्टमध्ये आढळणाऱ्या सोडियमपैकी एक तृतीयांश सोडियम अजिनोमोटोमध्ये असते. याचे सेवन केल्याने मिठाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पाणी शरीरातील पाणी अधिक प्रमाणात टिकून राहाते. यामुळे पायांना सूज येणे आणि रक्तदाब वाढणे यासारखे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.
6. निद्रानाश
अजिनोमोटो हे एक न्यूरोट्रांसमीटर आहे जे मेंदूच्या पेशी किंवा न्यूरॉन्सला उत्तेजित करते, ज्यामुळे तुम्हाला झोपेची समस्या उद्भवू शकते आणि निद्रानाश ट्रिगर करू शकते. यामुळे घोरणे आणि झोपेशी संबंधित श्वासोच्छवासाच्या विकारांचा धोका देखील वाढवू शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.