Health Tips: 5 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी आणि शांत झोप आवश्यक असते.
Health Tips
Health TipsSaam Tv
Published On

Health Tips : चांगल्या आरोग्यासाठी (Health) पुरेशी आणि शांत झोप आवश्यक असते. पुरेशी झोप झाली तर शरीराला आणि मेंदूला आराम मिळतो आणि शरीर पुन्हा कामासाठी तयार होते.

व्यवस्थित झोप झाली तर आपण थकल्याशिवाय दिवसभरातील सर्व कामे करू शकतो. आरोग्य तज्ञांनुसार निरोगी प्रौढ व्यक्तीला २४ तासांत किमान ८ तास झोप आवश्यक असते.

हा शरिराला आवश्यक असलेल्या झोपेचा आदर्श कालावधी आहे. तसेच ५ तासांपेक्षा कमी झोपणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कमी झोपेमुळे तुम्हाला अनेक जुनाट आजार (Disease) होण्याची शक्यता असते. अभ्यासात असे आढळून आले आहे की कमी झोप घेणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

Health Tips
Health Care : 'या' वाईट सवयींपासून दूर रहा, नाहीतर लवकरच येईल वृध्दपणा !

ब्रिटनमध्ये झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले आहे की वृद्धापकाळात पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या संशोधकांनी या अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे की, जे 50 वर्षांच्या वयात पाच तास किंवा त्याहून कमी झोपतात त्यांना गंभीर आजारांचा धोका २० टक्के जास्त असतो.

सात तास झोपलेल्या लोकांच्या तुलनेत पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोपलेल्यांना २५ वर्षांच्या कालावधीत किमान दोन गंभीर आजार होण्याचा धोका ४० टक्के असतो. यामध्ये हृदय आणि किडनी इत्यादी आजारांचा समावेश आहे.

पीएलओएस मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या निष्कर्षात असा दावा करण्यात आला आहे की ५०, ६० आणि ७० वर्षे वयाच्या पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोपल्याने दोन किंवा अधिक गंभीर आजारांचा धोका ३०-४० टक्क्यांनी वाढतो.

Health Tips
Health Tips : सकाळचा नाश्ता करणे का गरजेचे आहे ? जाणून घ्या, त्याचे योग्य कारण

अभ्यासाचे प्रमुख लेखक सेवेरिन साबिया यांच्या मते, "उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये बहुविकृती वाढत आहे आणि अर्ध्याहून अधिक वृद्धांना किमान दोन गंभीर आजार आहेत." आरोग्य सेवांचा अतिवापर, हॉस्पिटलायझेशन प्रकरणांमध्ये वाढ आणि अकार्यक्षमता यामुळे बहुविकृती हे सार्वजनिक आरोग्याचे मोठे आव्हान बनत आहे.

साबिया म्हणाली, 'जसे वय वाढते तसतसे झोपण्याच्या सवयी आणि पद्धतीत बदल होतो. लोकांना सात ते आठ तास झोपण्याचा सल्ला दिला जातो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com