Health Care : 'या' वाईट सवयींपासून दूर रहा, नाहीतर लवकरच येईल वृध्दपणा !

हल्ली वृध्दत्व हे ३० ते ४० वयातच दिसू लागले आहे.
Health Care
Health CareSaam Tv
Published on
Unhealthy Food
Unhealthy FoodCanva

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हल्ली वृध्दत्व हे ३० ते ४० वयातच दिसू लागले आहे. यात केस अकाली पांढरे होणे, गुडघे दुखी व इतर अनेक आरोग्याचा समस्या दिसून येत आहेत. त्यासाठी अशाच 5 वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला अकाली वयात येण्‍यास भाग पाडू शकतात. (Latest Marathi News)

Health Care
Morning Juice : रोज सकाळी 'या' रसाचे सेवन केल्यास मधुमेहींसाठी ठरेल फायदेशीर !
Not Active people
Not Active peopleCanva

अॅक्टिव्ह नसणे : वर्क फ्रॉम होम सारख्या वर्किंग कल्चरचा अवलंब केल्यामुळे बहुतेक लोक आता काम करण्यास कमी सक्रिय झाले आहेत. त्याची शारीरिक हालचाल इतकी कमी झाली आहे की, ते रोजच्या कामात आळशी होताय. त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

Stress
StressCanva

तणाव: ही एक अशी समस्या आहे, जी अकाली वृद्धत्वाव्यतिरिक्त आपल्यासाठी घातक देखील ठरू शकते. आजकाल तणावामुळे लोकांना अनेक आजार होत आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे केस देखील अकाली पांढरे होऊ लागले आहेत. जर तुम्हाला तणाव घेण्याची सवय असेल तर त्याकडे नक्कीच दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा.

Health Care
Morning Drink : सकाळी रिकाम्या पोटी 'हे' ड्रिंक्स प्या, आरोग्याला होतील असंख्य फायदे !
Unhealthy food
Unhealthy foodCanva

चुकीचा आहार : असं म्हटलं जातं की जर जेवण योग्य नसेल तर आपले शरीर वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागते. जंक आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आपल्या दिनचर्येचा एक भाग बनले आहेत, जे आरोग्यासाठी (Health) अत्यंत हानिकारक मानले जातात.

Smoking
SmokingCanva

नशा: लोकांना थोड्याशा तणावाने धूम्रपान किंवा मद्यपानाचे व्यसन लागते. आजकाल तरूणांमध्ये याचा ट्रेंड खूप वाढला आहे, पण ही सवय तुम्हाला अकाली म्हातारी बनवू शकते, तसेच ती घातकही ठरू शकते.

Sleep
SleepCanva

पुरेशी झोप न घेणे : तरुणांमध्ये गॅजेट्सचे प्रमाण इतके वाढले आहे की त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवरही होतो. झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली (Eye) काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि या समस्या दर्शवतात की तुम्ही लवकर वृद्ध होत आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com