Airtel चा स्वस्तात मस्त प्लान! दिवसाला खर्च करा ५ रुपये, वर्षभर मिळेल अनलिमिटेड कॉल्स करण्याची संधी

Airtel New Year Recharge Dhamaka : एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा नवा रिचार्ज प्लान आणला आहे. काही दिवसांपासून जिओ टेलिकॉम कंपनीने नवीन वर्षाचा रिचार्ज प्लान ऑफर केली. आता यामध्ये एअरटेलने देखील आपल्या ग्राहकांसाठी नवा प्लान आणला आहे.
Airtel New Year Recharge Dhamaka
Airtel New Year Recharge DhamakaSaam Tv
Published On

Airtel New Year Recharge Offer :

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा नवा रिचार्ज प्लान आणला आहे. काही दिवसांपासून जिओ टेलिकॉम कंपनीने नवीन वर्षाचा रिचार्ज प्लान ऑफर केली. आता यामध्ये एअरटेलने देखील आपल्या ग्राहकांसाठी नवा प्लान आणला आहे.

एअरटेल देखील आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक महिन्याला नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. या नव्या रिचार्ज प्लानमुळे अनेक कंपन्यांना टेन्शन येणार आहे. या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना एकादाच रिचार्ज करावा लागणार आहे.

एअरटेलने नुकताच नवा प्लान ऑफर (Offer) केला आहे. यामध्ये तुम्हाला फक्त दिवासाला ५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी कॉलिंग (Calls), डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळेल. जाणून घेऊया प्लानबद्दल सविस्तर

1. Airtel चा 1,799 रुपयांचा प्लान

एअरटेलाचा वार्षिक रिचार्ज प्लान हा १,७९९ रुपयांपासून (Price) सुरु होतो. या वार्षिक प्लानमध्ये तुम्हाला एसएमएस सुविधेसह अनलिमिटेड कॉल आणि डेटा प्लान मिळेल. यामध्ये तुम्हाला 24 GB चा डेटा मोफत मिळणार आहे.

Airtel New Year Recharge Dhamaka
New Year ला Jio चा धमाका! एका रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग्सह मिळणार 900 GB डेटा, युजर्सची होणार मज्जा

2. या प्लानचे फायदे

एअरटेलच्या १७९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना Free Hello Tune, wynk music चे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे. याशिवाय FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला महिन्यांचा खर्च २०० रुपयांपेक्षा कमी आणि दिवसाला ५ रुपयांपेक्षा कमी असणार आहे. हे सिम तुम्ही वर्षभर अॅक्टिव्ह ठेवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com