Relationship Tips : मुलाचा संसार सुखाचा असावा असं वाटतं? मग सूनबाईशी बोलताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Tips For Mother in Law : सूनेबरोबर तुमचं पटत नसेल तर प्रत्येक सासूने या टिप्स फॉले केल्या पाहिजेत. मुलाचा संसार अगदी सुखाचा होईल.
Tips For Mother in Law
Relationship TipsSaam TV
Published On

लग्न ठरल्यावर आपली मुलगी दुसऱ्यांच्या घरी राहणार, आपल्यापासून दूर जाणार या विचाराने मुलीचे आई वडील फार चिंतेत असतात. मुलीला सासरची मंडळी नीट समजून घेतील की नाही या बद्दल त्यांच्या मनात भीती असते. अशीच भीती मुलाच्या घरच्यांच्या मनात सुद्धा असते. नवीन मुलगी आपल्या घरी आल्यावर तिला येथे नीट राहता येईल का? आपल्या मुलाला ती व्यवस्थित समजून घेईल का? असे अनेक प्रश्न मुलाच्या आई वडिलांच्या मनात असतात.

अनेकदा सासूच्या भूमिकेत काही महिला आपल्या सुनेला भरपूर त्रास देतात. सर्व काही समजत असून देखील सूनबाईला सतत ओरडले जाते. मात्र असे केल्याने महिला स्वतःच आपल्या मुलाचा संसार मोडण्याच्या वाटेवर चालत असतात. त्यामुळेच आज आम्ही मुलाच्या सुखासाठी सासूबाईंनी काय केले पाहिजे आणि काय नाही याची माहिती सांगणार आहोत.

Tips For Mother in Law
Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला तुमच्याविषयी संशय येतोय? मग या मार्गांनी जिंका विश्वास

मुलीशी तुलना करू नका

प्रत्येक घरात मुलगी आणि सून असतेच. तुमच्या मुलीचे लग्न होऊन ती सासरी नांदत असेल आणि तिला तिच्या सासूबाई त्रास देत असतील तर तसाच त्रास तुम्ही तुमच्या सुनेला देऊ नका. असे केल्याने याचा पूर्ण परिणाम तुमच्या मुलावर होईल. तसेच मुलाचा सुखी संसार मोडून जाईल. मुलीच्या विविध गुणांचे कौतुक करताना आपल्या सुनेचा अपमान होणार नाही याची देखील काळजी घ्या.

जेवणाला नावं ठेवू नका

सद्या प्रत्येक घरात सूनबाई नोकरी करणाऱ्या आहेत. नोकरी करत असल्याने त्यांना घरात हवं तसं लक्ष देता येत नाही. कामाच्या व्यापात मुली दमून जातात. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाण्याआधी किंवा घरी आपल्यावर जेवण बनवताना काही वेळा पदार्थ चुकतात. असे होत असल्यास सूनबाईला ओरडू नका. काय केल्याने जेवण छान बनेल हे तुला समजावून सांगा.

कुटुंबात नसलेल्या व्यक्तींकडे मुलीची तक्रार करू नका

काही सासू आपल्या बहिणी, जाऊ बाई यांना सतत आपल्या सूनेबद्दल वाईट सांगतात. मात्र असे केल्याने त्या सूनबाईच्या मनातून उतरतात. काही केल्या मुलींना आपल्या सासू बद्दल प्रेम भावना वाटत नाहीत. त्यामुळे आपल्या सूनेचे काही चुकत आल्यास तिला समजावून सांगा. बाहेरच्या व्यक्तींना घरातील अडचणी सांगू नका.

सुनेच्या माहेरच्या माणसांना टोमणे नको

लग्न म्हटल्यावर काही ना काही कारणास्तव गोष्टी विसरल्या जातात. रिती रिवाज पूर्ण करताना काही गोष्टी राहून जातात. अशावेळी सासरच्या मंडळींनी आपल्या आई वडिलांना त्यांच्या परिस्थितीला समजून घ्यावे असा प्रत्येकाचा मसज असतो. मात्र काही ठिकाणी सासूकडून सुनेला सतत आई वडिलांवरून टोमणे मारले जातात. असे केल्याने संसारावर वाईट परिणाम होतो.

Tips For Mother in Law
Relationship Tips: रिलेशनशिपमधील गोडवा वाढवण्यासाठी सोप्या ट्रिक्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com