Healthy Pregnancy : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना विविध प्रकारचे आजार उद्भवतात. जीवनशैली आणि डाएट अशा प्रकारच्या अनेक सवयी महिलांच्या प्रजनन क्षमतेला प्रभावित करते. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमची प्रेग्नेंसी बूस्ट करू शकता.
आई होण हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील आनंददायी अनुभव असतो. अशातच अनेक महिला करियरकडे जास्त लक्ष देतात आणि गर्भधारणा होऊ देत नाहीत. अशातच महिलांचं वय जसं जसं वाढू लागत तेव्हा त्यांच्या एग्सची कॉलिटी आणि संख्या कमी होऊ लागते. वय वाढत असताना फर्टीलिटी कमी होत जाते.
ज्याप्रकारे कंसिव करण्यासाठी पुरुषांमधील स्प्रमची कॉलिटी आणि प्रमाण जास्त महत्वाचे असते. त्याचप्रमाणे महिलांमधील एग्सची कॉलेटी आणि प्रमाण देखिल मॅटर करते. बऱ्याच स्त्रिया बाहेर जाऊन काम करतात. दिवसभरातील कामामुळे त्यांना स्ट्रेस (Stress) होतो आणि त्यांच्यामधील फर्टिलिटी कमी होऊ लागते.
हेल्थ एक्सपर्ट म्हणतात की, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल महिलांच्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत हानिकारक असते. तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामध्ये महिला आपल्यामधील फर्टिलिटी बूस्ट करू शकतात. जाणून घेऊया त्याबद्दल
1. आरोग्यदायी पदार्थ
जर तुम्ही प्रेग्नेंसी कंसिव करत असाल तर तुम्ही बाहेरच जंक फूडचं (Food) सेवन टाळणे अत्यंत आवश्यक आहे. जी स्त्री गर्भाशयामध्ये बाळ वाढवत आहे. तीने आपल्या आजारामध्ये काही पोषक तत्वांचा समावेश केला पाहिजे. गरोदर स्त्रियांनी आपल्या आहारात फळे, हिररव्या पालेभाज्या अशा प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्याचं बरोबर गरोदर स्त्रियांनी गाजराचं सेवन जास्त प्रमाणात केलं पाहिजे. जेणेकरून एनिमिया या समस्येपासून आईचा आणि बाळाचा बचाव होऊ शकतो.
2. तणाव कमी घ्या
गरोदरपणात महिलांनी अधिक ताणतणाव घेऊ नये. तसेच गरोदर महिलांनी जास्त दगदग करू नये. ज्यामुळे त्यांच्या ओव्युलेशन वरती चुकीचं प्रभाव पडतो.
3. या गोष्टींपासून दूर राहा
गरोदर महिलांनी तंबाखू, गुटखा अशा प्रकारच्या व्यसनापासून दुर राहावे. त्याचबरोबर मांसाहारी पदार्थांच सेवन जास्त प्रमाणात करू नये. त्याचबरोबर महिलांनी दारूचं सेवन देखील करू नये. कंसिव करण्याआधी एखाद्या महिलेने दारूचे सेवन केले. तर गर्भधारणाचे चांसेस जास्त प्रमाणात असतात. हेल्थ एक्सपर्ट म्हणतात की तुम्हाला आई वडील व्हायचं असेल तर 30शीच्या आतमध्ये चान्स घ्या. कारण की 30 वयानंतर स्त्रियांमध्ये मिस्केरेजचा चान्स जास्त प्रमाणात वाढतो. सोबतच एग्सची कॉलिटीचे आणि प्रमाण कमी होऊ लागते.
4. लैंगिक संबंध नियमित ठेवा
हेल्थ एक्सपर्ट असं म्हणतात की 30च्या नंतर गर्भधारणा करणे हे महिलांसाठी अत्यंत कठीण होऊन बसते. त्यांना जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर जे कपल्स नियमित लैंगिक संबंध बनवतात. त्यांची गर्भधारणा त्या लोकांचा तुलनेत जास्त असते.
5. वेळेवर गर्भधारणेचे नियोजन करा
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला पालक व्हायचे असेल तर 30 च्या आधी गर्भधारणेचे नियोजन करा. वर नमूद केल्याप्रमाणे, वयाच्या 30 नंतर, स्त्रियांमध्ये गर्भपाताचा धोका खूप वाढतो, तसेच अंड्यांचा दर्जा आणि प्रमाण कमी होऊ लागते. वयाच्या ३० वर्षांनंतर गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना चिंतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. ३० वर्षांनंतर गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या महिलांनाही खूप तणावाचा सामना करावा लागतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, आपण 30 च्या आधी आपल्या गर्भधारणेचे नियोजन करणे महत्वाचे आहे. कारण या काळात महिलांच्या शरीरातील अंड्यांचा दर्जा आणि प्रमाण अगदी बरोबर असते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.