Adhikmaas Amavasya 2023 : अधिक मास अमावस्या; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पध्दत एका क्लिकवर

Adhikmaas Amavasya : या अमावस्येला स्नान, दान आणि पितरांचे श्राद्ध केल्याने पितृदोष, कालसर्प दोष आणि शनिदोषांपासून मुक्ती मिळते.
Adhikmaas Amavasya 2023
Adhikmaas Amavasya 2023Saam Tv
Published On: 

Shubh Muhurat, Pooja Vidhi : आज म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी अधिक मास अमावस्या आहे. ही अमावस्या दर तीन वर्षांनी एकदा येते. अमावस्येला स्नान, दान आणि पितरांचे श्राद्ध केल्याने पितृदोष, कालसर्प दोष आणि शनिदोषांपासून मुक्ती मिळते.

यासोबतच माणसाच्या जन्मानंतरची पापे नष्ट होऊन कुटुंबात सुख-समृद्धी येते. या व्यतिरिक्त जर तुम्ही अधिक मासच्या अमावास्येला काही विशेष काम (Work) केले तर तुमचे सर्व दु:ख दूर होतील. त्याचबरोबर अशी काही कामे आहेत, जी अमावस्येच्या दिवशी टाळावीत. चला तर मग जाणून घेऊया अधिक मासच्या अमावास्येला काय करावे आणि काय करू नये...

Adhikmaas Amavasya 2023
Adhik Maas Fourth Shravani Somvar 2023: चौथा श्रावणी सोमवार; या राशींसाठी शुभ संयोग, होईल महादेवाची कृपा

मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिथीला अमावस्या हा सण साजरा (Celebrate) केला जातो. यावेळी अमावस्या तिथी 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12:42 वाजता सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3:07 वाजता समाप्त होईल. यासोबतच या दिवशी वरियान योगही तयार होणार आहे, जो 15 ऑगस्टला संध्याकाळी 5.33 वाजता सुरू होईल आणि 16 ऑगस्टला संध्याकाळी 6.31 वाजता संपेल.

पूजन विधी

सर्व कामांतून संन्यास घेऊन ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. आषाढ अमावस्येला गंगास्नानाला अधिक महत्त्व आहे. म्हणूनच गंगेत स्नान करावे. जर तुम्हाला आंघोळीला जाता येत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून आंघोळ करावी. यानंतर भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करावे. पितरांच्या शांतीसाठी तर्पण, श्राद्ध वगैरे करता येते.

Adhikmaas Amavasya 2023
Adhik Maas Third Shravani Somvar 2023: अधिक मासातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग! या राशींचे उजळेल भाग्य, होईल धनलाभ

हे काम आधिक महिन्यातील अमावास्येला करावे -

  • पितरांसाठी भुकेल्या आणि गरीब लोकांना (People) अन्न द्या. त्यांना गोड भात वाटप करा. असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होऊन संपत्ती येते.

  • या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे करून पिठाचे गोळे माशांना खाऊ घालावेत. असे केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतील.

  • जर तुम्हाला कालसर्प दोषाचा त्रास होत असेल तर अधिक महिन्यातील अमावास्येला चांदीच्या नागाची पूजा करून वाहत्या पाण्यात वाहून जावे.

  • पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गाई, कुत्रे आणि कावळे यांना अधिक महिन्याच्या अमावास्येला खाऊ घालणे आवश्यक आहे.

  • अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला तेलाने माखलेली भाकर खाऊ घातल्याने शत्रूंचे भय नाहीसे होऊन शत्रूंवर विजय प्राप्त होतो.

अधिक महिन्यातील अमावास्येला हे काम करू नये -

  • असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात, त्यामुळे अमावस्येच्या रात्री कोणत्याही निर्जन ठिकाणी जाणे टाळावे. विशेषत: चुकूनही स्मशानभूमीकडे जाऊ नका.

  • अमावस्येच्या दिवशी घरात भांडणे टाळावीत. अमावस्येला तुम्ही घरातील सदस्यांशी वाद घालत असाल तर तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com