Shravan 2024 : श्रावण सोमवारी केस धुणे योग्य की अयोग्य? शास्त्र जाणून घ्या

Hair Wash Tips : सणासुदीला केस धुणे महत्त्वाचे असते. मात्र केस धुताना वार देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण चुकीच्या दिवशी केस धुतल्यास आरोग्यावर तसेच जीवनावर नकारात्मक परिणाम होतात.
Hair Wash Tips
Shravan 2024SAAM TV
Published On

महिला केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घेतात. कारण प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. विशेषतः स्त्रिया सणासुदीला नटूनथटून तयार होतात. श्रावण सोमवारी तर महिला संपूर्ण साज श्रृंगार करून व्रत करतात. अनेक महिला सणांना केस धुतात. पण श्रावणात सोमवारी केस धुवणे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. या मागची कारणे सविस्तर जाणून घ्या.

श्रावणात पाऊस असल्यामुळे हवामान दमट होते. याचा परिणाम केसांवर होऊन केस तेलकट होतात. यामुळे महिला सतत केस धुवतात. मात्र जास्त केस धुणे आरोग्यास चांगले नाही. केसांची स्वच्छता करावी, पण मर्यादित स्वरूप असावे. वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत बिघडून केस गळती सुरु होते. तसेच केसांची वाढ खुंटते. श्रावणात सोमवारी केस धुतल्याने जीवनात अनेक अडचणींना आमंत्रण मिळते. याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर होतो. श्रावणात सोमवारी केस धुतल्यास घरावर आर्थिक भार वाढतो. पैशांची चणचण भासते. यामुळे श्रावणात सोमवारी केस धुवणे टाळावे.

Hair Wash Tips
Raksha Bandhan 2024 : यंदा रक्षाबंधन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, 'या' देवांना बांधा राखी, होतील मनोकामना पूर्ण

कोणत्या दिवशी केस धुवू नये?

गुरुवार आणि बुधवारी केस धुवू नये. कारण यामुळे कुंडली दोष निर्माण होतात. तसेच कर्जबाजारी होण्याचा धोका वाढतो.

केस कधी धुवावे?

शास्त्रानुसार रविवार, मंगळवार, शुक्रवार हे तीन दिवस केस धुवण्यासाठी उत्तम मानले जातात. तसेच केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवणे गरजेचे आहे. रविवार सुट्टीचा वार असल्यामुळे अनेक लोक केस धुवतात. मात्र जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर मंगळवार आणि शुक्रवार केस धुवण्यासाठी उत्तम वार आहेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Hair Wash Tips
Shravan Special : ना कांदा, ना लसूण तरीही बनेल हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही, चव जिभेवर रेंगाळत राहील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com