
दातांमध्ये पोकळी आणि हिरड्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांची संख्या वाढत चालली आहे. दहा मुलांपैकी किमान दोन मुलांना दात किडण्याच्या समस्येने ग्रासलं आहे. त्यात दुधाचे दात किडण्याचे प्रमाण अधिक आहे. हे दात आता पडणारच आहेत म्हणून त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते, ते चुकीचे असून हे दात किडून नाही तर नैसर्गिकपणे पडणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना नियमित डेन्टल चेकअपसाठी घेऊन जाणे व दुधाच्या दातांच्या कुठल्याही समस्या असल्यास त्वरित दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे .
रात्रीच्या वेळी अनेक पालक आपल्या बाळांना बाटलीत दूध किंवा ज्यूस घालून पाजतात व मुलं ती बाटली तोंडातच ठेवून झोपून जातात. असं केल्यास ते गोड पदार्थ रात्रभर बाळाच्या तोंडातील दातांवर साठून राहतात. तोंडातील जिवाणू याच गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात, जिवाणू दातांवर हल्ला करून अम्लपदार्थ सोडतात ज्यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात. हा प्रकार रोज घडल्याने दुधाचे दात पूर्णपणे नष्ट होतात.
अंकुरा हॉस्पिटलमधील डॉ. अभिनव तळेकर( बालरोग आणि प्रतिबंधात्मक दंतचिकित्सक) सांगतात की, ओपीडीमध्ये मला भेट देणाऱ्या ५ ते १५ वर्षे वयोगटातील १० पैकी ७ मुलांना आता ऑर्थोडॉन्टिक समस्या सतावतात. लहान मुलांच्या दंत समस्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यात लक्ष न दिल्याने कायमचे दात वाकडे येणं, जर दूधाच्या दातांमध्ये जागा नसेल किंवा हे दात वेडेवाकडे असतील तर पक्क्या दातांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणं ही त्याचं लक्षण आहेत. यासाठी दंत चिकित्साकडे चेकअप करून घेणं गरजेचं आहे. जर वेळीच उपचार केले नाहीत तर त्यामुळे दुधाचे दात लवकर पडू शकतात.
अंकुरा हॉस्पिटलचे डॉ. उमेश वैद्य यांनी सांगितलं की, दातांचे आरोग्य हे मुलाच्या एकूण आरोग्याचा एक आवश्यक भाग आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. इतर आरोग्य समस्यांप्रमाणेच, दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी दंत समस्यांवर वेळीच उपचार केले पाहिजेत.
सुरुवातीपासूनच मुलांचे दात स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांना दिवसातून दोनदा चांगल्या टूथपेस्टने ब्रश करायला सांगा. बाळाच्या दातांवर काळे किंवा पांढरे डाग पडणे, दात दुखणे, मुलांची चिडचिड होणे, दातांना थंड पदार्थांचा त्रास होणे, तोंडातून दुर्गंधी येणे तसेच दात किडन्याची लक्षणं दिसल्यास त्वरीत दंतचिकीत्सकांचा सल्ला घ्या असंही डॉ. उमेश वैद्य यांनी स्पष्ट केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.